मामा बनला कसं....भाच्याचा केला खून


मुंबई:- कौटुंबिक वादात भाचा मधात पडल्याने मामाने भाच्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील विनायक कुंडल सोसायटीत रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यश संजय तिवारी (22) असे मृतक भाच्याचे नाव आहे तर सतीश राजनारायन दुबे (31) असे खुनी मामाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी हिच्या घरी राहतो. सरिताच्या घरात तिचा पती, मुलगा यश ,सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे एकत्र राहतात. कौटुंबिक वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाचा यश मध्ये पडला. त्याचा राग सतीशला आला. त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने यशवर वार केले. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांना ही माहिती तात्काळ देताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सतीशला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाच तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post