पंचनाम्यासाठी 'ई पीक पाहणी'ची अट शिथिल..

💁🏻‍♂️ अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जलद गतीने होण्यासाठी 'ई पीक पाहणी' पंचनाम्याची अट काही दिवसांसाठी शिथिल करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत.

🚨महसूल मंत्री विखे गेल्या तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करत आहेत तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. आज, मंगळवारी त्यांनी शेवगाव व पारनेर तालुक्याला भेट देत शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला.

👉🏻पंचनामा करताना 'ई पिक पाहणी'साठी अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. पंचनाम्याबाबत तक्रारी व त्रुटी राहू नयेत, त्यासाठी आपण सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आता काही दिवसांसाठी ई-पीक पाहणीची अटही शिथिल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

🗣️ पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांकडून पंचनाम्या संदर्भात येत असलेल्या तक्रारीची दखल घेवून 'ई पीक' पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसां करीता शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. अनेक ठिकाणी रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांकडे ॲन्डरॉईड मोबाईल नाहीत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनामे होतील की नाही अशी भीती असून या संकटात पंचनाम्याच्या बाबतीत कोणतीही त्रुटी राहू नयेत म्हणून, सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post