मला (रावण) पेटवता थांबा.... तुम्हालाच पेटवतो

हरियाणा - देशात नवरात्रीची धूम विजयादशमीला रावण दहन करीत समाप्त झाली, मात्र काही ठिकाणी रावण दहनाने काही अपघातही घडले.


हरियाणातील यमुना नगरमध्ये बुधवारी दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दसरा ग्राऊंडवर रावण दहन करण्यात येणार होते. तर दहन करण्यासाठी रावणाचा 80 फूट उंच पुतळा तयार करण्यात आला होता.



यानंतर सायंकाळी तो दहन करण्यातही आला. मात्र दहनावेळी हा जळणारा पुतळा थेट खाली उपस्थित असलेल्या गर्दीवर पडला. यामुळे अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे. तर यात कोणतीही जिवित हानी झाल्याचे अद्यापही समोर आलेलं नाही.

शहरातील दसरा ग्राऊंडवर रावण दहनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तर जेव्हा रावण दहन करण्यात आला, त्यावेळी उपस्थित लोकांमधील काही जण पुतळ्याचे जळणारे तुकडे गोळा करण्यासाठी धावले. या वेळीच त्या जमावावर जळणारा पुतळा पडला.

व्हिडियो
👇👇👇👇👇



रावन दहनावेळी 80 फूट उंच पुतळ्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान हा पुतळा अचानक उपस्थित लोकांवर पडला. यावेळी पुतळ्यात भरण्यात आलेल्या फटाक्यांचा भडका उडाल्याने त्यात काही जण भाजले असल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post