कबड्डी कबड्डी....पदर डोक्यावर घेऊन तो कंबरेशी खोचून महिला खेळल्या कबड्डी

छत्तीसगड:- गावाकडच्या बायका म्हणजे एकतर शेतात राबणाऱ्या किंवा डोक्यावरुन पाणी वाहून नेणाऱ्या, नदीकाठी कपडे धुवत असलेल्या किंवा घरात रांधत असलेल्या असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र या सगळ्याला फाटा देत गावाकडच्या महिला कबड्डीच्या मैदानात रमल्याचे पाहायला मिळाले. या महिलांचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर त्यांचे बरेच कौतुक होत आहे. हा व्हिडिओ छत्तीसगड ऑलिम्पिकचा असून स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी केले. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही ऑलिम्पिक स्पर्धा ६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल कबड्डी कबड्डी...आणू का कबड्डी
👇👇👇👇👇👇👇



प्रसिद्ध सनदी अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवनीश शरण कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असतात, हा व्हिडिओ त्यापैकीच एक आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना ते म्हणतात, ‘हम किसीसे कम है क्या!!!’ हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. पदर डोक्यावर घेऊन तो कंबरेशी खोचून अतिशय उत्साहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे

Post a Comment

Previous Post Next Post