जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू'


चिमूर :- चिमूर तालुक्यातील खंडसगी गावातील येथील बचत गटाच्या महिलांनी 'दारूमुक्त निवडणुकी' साठी पुढाकार घेण्याची गरज आहे 'जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू' असा संकल्प केला पाहिजे त्यामुळे उमेदवारांनीही निवडणूक काळात दारूचे वाटप करणार नाही असा संकल्प गावातील नागरिक महिलांनी करावा ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. गावपातळीवरील निवडणूक असल्याने सर्वत्र तालुक्यात चर्चा सुरू आहे.

ग्रामपंचायत १६ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. आचारसंहिता लागू देशी दारूचे दुकान दोन दिवसा पर्यन्त बंद आहे परंतु शुक्रवारला रांत्री ११:३० वाजेच्या सुमारात देशी दुकानातुन गाड्यानी देशी दारूच्या पेट्या नेत असल्याची चर्चा गावात सुरू असून याचं देशी दारूमुळे ग्राम पंचायत निवळणूकीच्या दिवसाला शांतता सुव्यवस्था खंडित करण्याचे काम काही गावातील उमेदवार करत आहे यातूनच पुढे नागरिकांना महिलांना त्रास सहन करावा लागतो. गावातील नागरिकांनी एकत्रित येऊन 'दारूमुक्त निवडणुकी'चा ठराव घेतला पाहिजे गावाच्या विकासासाठी दारूमुक्त निवडणूक अत्यन्त आवश्यक आहे. निवडणूक काळात दारूचे वाटप झाल्यास दारूविक्री बंद च्या दिवसाला सुद्धा गावात दारू सुरू होण्याची शक्यता नाकरता येत नाही दारूचे आमिष दाखवून निवडून येणारा उमेदवार गाव विकासात अडचण निर्माण करू शकतो. त्यामुळे दारूचे वाटप न करणारा, निर्व्यसनी उमेदवारालाच आमचे मत, असा निर्णय नागरिकानी द्यायचा आहे.


Post a Comment

Previous Post Next Post