अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या प्रमाणात झाली वाढ

अल्पवयीन मुली असुरक्षित

मुली पळविण्यासह बलात्कार, विनयभंगाचे प्रकार वाढले




गोंदिया, गडचिरोली (विदर्भ):- चोरी, दरोड्याप्रमाणे आता अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पालक आणि पोलिसांच्या चिंतेची बाब ठरत आहे. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान एक घटना जिल्ह्यात घडत आहेत. अनेक मुलींना पळवून नेण्यात आले. विवाहित महिलांचा शारीरिक व मानसीक छळ करण्यात आला. विनयभंगाच्या घटना देखील नोंदविण्यात आल्या. अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्यात आले .

 आजच्या मोबाईलच्या युगामध्ये अल्पवयीन तरुण-तरुण कुठल्याही चांगल्या गोष्टीचे भान न ठेवता फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून एकमेकांना चॅटिंग करून (कोवळ्या वयाच्या) अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात खोटे आश्वासन देऊन फसविले जाते परिणामी काही मुली प्रेमाच्या धुंदीत मुलासोबत प्रेम विवाह करतात पण ज्यांच्याकडे फुटकी कवडी नाही आणि बेरोजगार, टवाळखोर अशा मुलांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसून आपल्या जीवनाचा सत्यानास करतात. नंतर ही बाब लग्न झाल्यानंतर त्या मुलींना लक्षात येते. पण त्या गोष्टीला बराच उशीर झालेला असते. पण या घडणाऱ्या गोष्टीला जबाबदार कोण हे तपासणे अधिक महत्त्वाचे आहे. तरुण मुले मुलीला फसवण्यासाठी विविध आमिषे दाखवतात त्याला तरुणी बळी पडतात परंतु ते स्वतःचा डोक्याने कधी विचार करत नाही त्या मुलाचे वर्तन कसे आहे ? त्याचा कुटुंब कसा आहे ? तो काय करतो ? या सर्व गोष्टीचा मुलीने सर्वप्रथम विचार करावा. तसेच त्याचे हक्क काय आणि अधिकार काय यांना जाणीव करून देणे हे पालकाचे आद्य कर्तव्य आहे.मित्र मैत्रीणींनो प्रत्येक वेळीच लहान वयात झालेलं प्रेम त्याच्या ध्येयापर्यंत पोहचताना सहजासहजी मार्ग काढेल असं नाही. तर कधी कधी हेच प्रेम आपल्या आयुष्यात संकटांचा डोंगर बनून देखील येऊ शकतो. प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हदयाने निर्णय घेतात. ज्यामुळे अशा काही गोष्टी घडतात की त्याचा पश्चाताप त्यांना आयुष्यभर करावा लागतो. असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

व्हिडियो
👇👇👇👇👇👇



एखाद्या तरुणाने तरुणीला अश्लील भाषेत बोललास सदर तरुणाची तात्काळ पोलीस स्टेशनला किंव्हा तंटा मुक्त समितीला माहिती द्यावी म्हणजे जेणेकरून त्या तरुणापासून आपल्याला भविष्यात कुठलाही धोका होणार नाही आणि टवाळखोर मुलांना धडा मिळणार यात काही शंका नाही. यासाठी मुलीला आणि वडिलांनी जागृत होण्याची अत्यंत गरज आहे. शक्यतो मुलीं मुले मोबाईल हाताळत असताना त्या मोबाईल कडे सुद्धा पालकाचे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काही मुले मुली तर चक्क बापालाही उल्लू बनवतात आणि म्हणतात की मी मित्रासोबत बोलत आहोत. पण ते तसे नसून ते वाम मार्गाने जात असल्यामुळे अशा तरुण तरुणीवर लक्ष ठेवून समजावून सांगण्याचे काम हे त्यांच्या आई - वडिलांचे आहे. त्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तरुणीचे आई,वडील जागृत नसल्यामुळे आज सगळीकडे दररोज बलात्कार होत आहेत या गोष्टीचे चिंतन करणे महत्त्वाचे आहे.
आकर्षण वाटलं म्हणून प्रेमात पडू नका. प्रेमात पडण्याआधी त्या मुला-मुलीबद्दल सर्व माहिती जाणून घ्या. कधी कधी नातं सुरु करण्यासाठी खोटी माहिती समोर ठेवली जाते म्हणून तिचा सुरुवातीलाच पडताळा करणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीच्या भूतकाळाची आणि तो कोणत्या मित्रमंडळींमध्ये वावरतो याचीही चौकशी करायला हवी. कारण ब-याचदा आपण ज्या लोकांमध्ये वावरतो त्यांचा प्रभाव आपल्यावर प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नात्याचा पाया हा मजबूत करण्यासाठी सर्व बाजूंनी ते सुरक्षित आहे का हे पाहणं आपली स्वत:ची जबाबदारी असते.


त्यामुळे अल्पवयीन वयामध्ये तरुणीने शिक्षणाकडे लक्ष देऊन आपल्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी लक्ष दिले पाहिजे आणि तरुणींनी वाईट मार्गाला न जाता आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा विचार करून पुढील कार्य केले पाहिजे.

व्हिडियो
👇👇👇👇👇👇



तसेच अल्पवयीन मुलींसह महिला देखील अत्याचाराच्या बळी पडल्या. विशेष म्हणजे या अपहरणांमध्ये परिचित किंवा परिसरातील तरूणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

अल्पवयीन विवाहितांचा शारीरिक छळ



माहेरून हुंडा आणण्यासाठी तो आणला नाही म्हणून, मूल होत नसल्याने विवाहितांचा छळ करण्यात येते. अशा प्रकरणात विवाहित महिलांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो. अलीकडे या घटनांमध्ये देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

शाळकरी मुले आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांत जिल्ह्यामध्ये अलिकडे वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्यास त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार, पोलिस भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदवितात.प्रेमप्रकरणातून पळून गेल्याने निष्पन्न होते. अशाप्रसंगी कुटूंब तडजोडीकडे वळता असल्याचा अनुभव आहे.


बदनामीमुळे माघार

मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने घाबरलेले पालक पोलिसांत तक्रार करतात. अल्पवयीन असल्याने पोलिसही गुन्हा दाखल करून गांभीर्याने तपास करतात. मात्र आरोपी पकडल्यानंतर प्रेमप्रकरण समोर येते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्रास व बदनामीच्या भितीने अशा प्रकरणांत अनेकदा पालकांकडून माघार घेतली जाते. काही वेळेला त्याचा बागुलबुवा करूनही प्रकरण मागे घेण्यास भाग पाडले जाते.


Post a Comment

Previous Post Next Post