स्विस बँकेत पैसे भरासाठी महीला तहसीलदाराने घेतली 2 लाख रुपये लाच

मुंबई:- २ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली आहे. मिनल कृष्णा दळवी असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.


याबाबत अधिकची माहिती अशी की, अलिबागचे तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार महिलेकडे बक्षीसपत्र मिळालेली जमीन सास-यांच्या नावे नोंद होण्यासाठी एजंट मार्फत पाच लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रूपये देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदार महिलेने नवी मुंबई लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळून पाहण्याच्या कारवाईला सुरूवात झाली.

दरम्यान एजंट राकेश चव्हाण याने स्वतःसाठी आणि तहसीलदारांसाठी तीन लाख रूपयांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज पुन्हा तहसीलदार यांनी सदर कामासाठी दोन लाख रूपये एजंटकडे देण्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर शुकवारी (दि.११)अलिबाग नगरपालिका समोरील आर.के. इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तक्रारदार महिलेकडून एजंट राकेश चव्हाण याला दोन लाख रूपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

दरम्यान, दळवी यांच्या मुंबूई-विक्राेळी येथील घरातून तब्बल एक काेटी रुपयांची राेख रक्कम सापडली आहे. या ठिकाणी मुंबईतील पथकाने कारवाई केली तर अलिबाग येथे रायगड पथकाने छापा टाकला. अलिबागच्या घरातून सुमारे ६० ताेळे साेने तपास यंत्रणांना सापडले आहे. मुंबई-विक्राेळी येथील घरातून काही महत्वाचे दस्ताऐवज सापडले आहेत. त्यानुसार दळवी यांची अन्य काेठे मालमत्ता आहे का तसेच अन्य कोणत्या ठिकाणी अशाच प्रकारची माया जमवली आहे का याचा शाेध तपास यंत्रणा घेत आहेत, असेही पाेलीस अधीक्षक ज्योती देशमुख यांनी स्पष्ट केले.

सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी अशा प्रकारे नागरिकांकडे लाचेची मागणी करत असतील तर, नागरिकांनी न घाबरता याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post