शारीरिक संबंध प्रस्थापित करताना जोरजोरात येतोय आवाज, शेजाऱ्यांनी केली पोलिसांत तक्रार

एका कपलचा सेक्स करताना गवत छाटण्याच्या यंत्रापेक्षा मोठा आवाज येत असल्याचा आरोप करत शेजाऱ्यांनी थेट पोलिसांत तक्रार केली आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक युजर्स याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. अनेकदा लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग, घटना किंवा अशा गोष्टी ज्यामुळं लोकांना कुतूहल किंवा आनंद वाटेल अशा अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. त्यामुळं त्यांना प्रसिद्धीही मिळते. परंतु आता सोशल मीडियावर एका जोडप्याचं प्रकरण चांगलंच व्हायरल होत आहे. लिडिया बार्कर आणि बिली ब्राउन या दोन जोडप्यांच्या घरातून संभोग करतानाचा मोठा आवाज येत असल्यानं शेजाऱ्यांनी त्यांच्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार केली आहे. परंतु या जोडप्यानं शेजाऱ्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. परंतु आता या घटनेवर अनेक लोकांनी उलटसुलट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे

बार्कर आणि ब्राउन या दोन्ही जोडप्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं या घटनेविषयी माहिती देताना म्हटलं आहे की 'त्यांच्या घरातून नेहमीच ते सेक्स करत असताना फार आवाज येत असतो, मी एकदा माझ्या लॉनमधील गवत कापत होतो तेव्हा मला त्यांचा खुप जोरजोरात आवाज येत होता, शेवटी मला हेडफोन्स वापरावे लागले'. त्यामुळं त्याच्या परिसरातील लोकांनाही या घटनेविषयी आश्चर्य वाटत आहे.

सध्या बेरोजगार असलेल्या बार्कर आणि ब्राउन या जोडप्याला आता शेजाऱ्यांनी सेक्स करताना आवाज करू नये म्हणून नोटिस बजावली आहे. तर काही लोकांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. परंतु तक्रारदारांनी या बार्कर आणि ब्राउन या जोडप्याशी न बोलता ते थेट पोलिसांत गेल्यानं ते चांगलेच संतापलेले होते. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post