पगार पडला कमी... घेतली लाच


अमरावती :-
गारमेंट व्यवसाय आणि शिलाई प्रशिक्षण सुरू करण्यासाठी एनोसी देण्याकरिता लाच मागणे भातकुली नगर पंचायत च्या मुख्याधिकारी श्रीमती
करिश्मा सतीश राव वैध यांना चांगलेच भोवले आहे. लाच स्वीकारताना त्यांना आज त्यांच्या राहत्या घरी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
उपलब्ध माहिती नुसार या प्रकरणातील तक्रारदार यांना भातकुली येथे शिलाई प्रशिक्षण आणि गारमेंट्स व्यवसाय टाकायचा होता. त्यासाठी त्यांना नगर पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता त्यांनी संबंधिताला 50 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नंतर दि. 2/11/ 2022 रोजी पडताळणी केली असता तडजोडी अंती 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.
दि.10/11/2022 रोजी तडजोडीची रक्कम देण्याबद्दल पडताळणी करण्यात आली असता सदर रक्कम त्यांनी राहत्या घरी न्यु महालक्ष्मी नगर अमरावती येथे घेऊन यायला सांगितली. आज दि 11/11/2022 रोजी त्यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक करा यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मा. अप्पर पोलीस अधीक्षक,अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रवीण पाटील यांनी केली.
या कारवाईत प्रविण पाटील पोलीस निरीक्षक,
केतन मांजरे पोलिस निरीक्षक, मपोहा साबळे पोना-राहुल वंजारी, पोना-विनोद कुंजाम ,
पोना- युवराज राठोड चालक पोना नाईक ला.प्र.वी.अमरावती.यांनी सहभाग नोंदविला

Post a Comment

Previous Post Next Post