समाज कल्याण अंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतीगृहातील अधिक्षकांवर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्यासाठी वंचितचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने* -


गडचिरोली,
       समाज कल्याण अंतर्गत असलेल्या गडचिरोली येथिल रामनगरातील मागासवर्गीय मुलींचे शासकिय वसतीगृहातील अधिक्षक एम जी मडावी यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
        जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आज १० नोव्हेंबर पासून पूर्ववत शाळा कॉलेज सूरू झाल्याने वसतीगृहात राहणा-या मुली  काल दिनांक ९ नोव्हेंबर रोजी आपापल्या गावाकडून वसतीगृहात काल संध्याकाळचे ४ वाजेपर्यंत परत आल्या असता वसतीगृहातील अधिक्षीका एम जी मडावी यांनी तुम्ही आजपासून कशाला आल्या , तुम्हाला कोण बोलावलं, फुकटचा खायला भेटते म्हणून आल्या कां? असे उध्दटपणे बोलून मुलींना शिवीगाळ केले व तुमच्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन शाळा सुरू झाल्याचे पत्र आणा तरच तुम्हाला राहायला व खायला मिळेल अशी धमकी देऊन  व वसतीगृहातील पाणी पिण्यास मनाई केल्या, पाण्याविणा मुली व्याकूळ होऊन बाजूच्या घरचे पाणी मागून प्यावे लागले एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर त्यांनी संध्याकाळी येथे थांबायचे नाही म्हणून ९ मुलींना वसतीगृहाच्या बाहेर काढले ह्या प्रकरणाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी वसतीगृहात पोहचले व संबंधीत अधिका-यांना माहिती देऊनही काहीच उपयोग झाला नाही त्यामूळे सर्व १४ मुलींनी  पोलिस स्टेशन गडचिरोली येथे जाऊन अधिक्षका एम जी मडावी यांची तक्रार देण्यात आली परंतु पोलिसांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केला नाही.
     ही घटणा अत्यंत निंदणीय असून वसतीगृहातील पाणी पिण्यास मनाई करणे, संध्याकाळी ६ वाजता बाहेर काढणे हा प्रकार अस्पृश्यतेला खतपाणी घालणारे व मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार करणारे आहे त्यामूळे अधिक्षक मडावी यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्यात यावे ही मागणी घेऊन  वंचितच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.
      जोपर्यंत गुन्हा दाखल करून निलंबन केल्या जात नाही तोपर्यंत  आंदोलन चालूच राहील अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली.  प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करण्यात यावी अशी चर्चा जिल्हाधिकारी यांच्याशी करण्यात आली. अन्यथा आंदोलन तिव्र करण्यात येईल असा ईशाराही यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांनी दिला आहे.
        निदर्शन करतेवेळी महासचिव योगेंद्र बांगरे, उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, भारत रायपूरे, सोनलदिप देवतळे,भोजूभाऊ रामटेके, तुळशिराम हजारे, जावेद शेख, गोपाळा मोटघरे, शितल खोब्रागडे , करूणा जनबंधू सपना करमे, प्रविणय खोब्रागडे आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post