जंगलात पळवून नेऊन केला बलात्कार


मुलीवर अत्याचार नांदेड जिल्ह्यातील घटना: दोघांना अटक

शिवणी (जि. नांदेड) : एका अल्पवयीन मुलीला जंगलात पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना किनवट तालुक्यातील शिवणी येथे घडली असून, नागरिकांत संताप व्यक्त केली. होत आहे. पोलिसांनी आरोपीसह मात्र, त्याला मदत करणाऱ्या युवकास अटक केली आहे.

पीडित मुलीच्या वडिलांचा भंगार खरेदीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानावर खरेदीतून जमा झालेल्या भंगार साहित्याची वाहतूक करण्यासाठी टेम्पो आहे. या टेम्पोवर काम करण्यासाठी मागील एक महिन्यापासून एक युवक कामाला होता. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील जेवण करीत असताना, आरोपी युवक आणि त्याचा एक मित्र मोटारसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. त्याने बाहेरून आवाज दिल्याने पीडित मुलगी घराबाहेर आली असता, तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसविले. यावेळी मुलीने आरडाओरड केली

तोपर्यंत आरोपींनी मोटारसायकल जंगलाच्या दिशेने नेली. पीडित मुलीच्या परिवारातील सदस्यांनी जंगलात मुलीचा शोध घेतला, तेव्हा २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुलीचा शोध लागला. त्यानंतर, मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.

या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलिस ठाण्यात आरोपी युवक व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे


Post a Comment

Previous Post Next Post