युवक-युवतींना आगामी पोलीस भरती व ईतर स्पर्धा परिक्षा, रोजगार, शिक्षण, खेळ या विषयावर मार्गदर्शन



पोलीस स्टेशन केशोरी दिनांक -०६/११/२०२२
पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत स.दु.क्षेत्र भरनोली कार्यक्षेत्रातील ग्रामिण व आदिवासीबहुल अतीसंवेदनशिल भरनोली गावातील दिपस्तंभ वाचनालयात उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर सा. यांनी भेट देऊन उपस्थीत युवक-युवतींना आगामी पोलीस भरती व ईतर स्पर्धा परिक्षा, रोजगार, शिक्षण, खेळ या विषयावर मार्गदर्शन केले व त्यांना मैदानी तसेच लेखी परिक्षेबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच ग्रामिण भागातील युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पोलीस भरतीमध्ये सहभाग घेऊन पोलीस दलात भरती व्हावे असे आवाहन यावेळी केले.

तसेच या भागातील मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे सांगीतले. या भेटीमुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करित असलेल्या युवक -युवतींना योग्य मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांना विविध परिक्षेची सुद्धा माहिती मिळाल्याचे युवकांनी सांगीतले. सदर वाचनालयात, आदिवासी दुर्गम, अतीसंवेदनशील नक्षलग्रस्त भरनोली, राजोली, खडकी, बोरटोला, नागणडोह, जांभळी, सायगाव या गावातील युवक-युवती अभ्यास करतात. यावेळी स. दु. क्षेत्र भरनोलीचे प्रभारी अधिकरी टार्फे व ईतर पोलीस अंमलदार तसेच परिसरातील नियमित प्रशिक्षण घेणारे २५ युवक-युवती हजर होते.


Post a Comment

Previous Post Next Post