आईबापाला सुद्धा कळले पाहिजे कि,मुलगा ,मुलगी वयात आली तर लग्न करावे.


 मुलांना कळते. मुलींना कळते . आईबापाला सुद्धा कळले पाहिजे कि,मुलगा ,मुलगी वयात आली तर लग्न करावे.मुलाचे,मुलीचे लग्न न करण्यामागे आईबापांचा दुष्ट हेतू असतो.हे सुद्धा आपल्याला कळले पाहिजे.नक्कीच.तरूणीला फूस लावण्यात जितका दुष्ट हेतू त्या तरूणाचा होता,तितकाच दुष्ट हेतू उपवर मुलगी लग्नासाठी ताटकळत ठेवण्यात आईबापाचा होता.किंबहुना त्याहून जास्त.तरुण मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर त्यांचे लग्न टाळणे,त्यांना ताटकळत ठेवणे हा सुद्धा वाईट हेतू असतो.जर कोणी सांगितले कि ,मुलाचे लग्न करा.संसाराला लावा.मुलीचे लग्न करा संसाराला लावा.तेंव्हा आईबाप उत्तर देतात,तो अजून काही कमवत नाही.त्याला आम्ही फुकट खाऊ घालतो,तर त्याच्या बायकोला कोण खाऊ घालील?संतान विषयी आर्थिक हेतू ठेवणे अनैतिक आहे.संतान ही समाधानाच्या,आधाराच्या निमीत्ताने जन्माला घातली जातात. मुलगी वयात आली,हे कळत असूनही तिचे लग्न करीत नाहीत, हेतूपुरस्सर टाळतात.म्हणे ,तिच्यासाठी काही नोकरी पहा.नोकरीनंतर पाहू,लग्नाचे.असे आईबाप मुद्दाम मुलीचे लग्न करीत नसतील तर ते सुद्धा नालायक असतात.त्यांचा हेतू असतो पैसा कमावणे.जे आईबाप पैशांसाठी मुलगा,मुलगी अविवाहित ठेवतात,ते नालायकच असतात.नव्हे दुष्ट असतात.ती माणसे बाजारू वृत्ती चे असतात.संसारी वृत्तीचे नसतात.अशा नालायक, असामाजिक,बाजारू वृत्ती चे लोकांसाठी अश्रू गाळणे, सहानुभूती बाळगणे सुद्धा चुकीचे आहेच.येथे आफताब पेक्षा आई बाप जास्त दोषी आहेतच.येथे धर्म हा फॅक्टर महत्वाचा नाही.येथे निती हा फॅक्टर महत्वाचा आहे.असे अनैतिक आईबाप माझ्या भोवताली दिसतात.तुमच्या भोवताली दिसतात.मुलगा मुलगी म्हणजे संतान न समजतात ते सुद्धा पैसा कमवण्याचे साधन समजतात.गाई म्हशी बैलासारखे.
     


काही आईबाप तर मुलीचे लग्न करतांना पैसा मागतात.जसा आधी मुलाचे आईबाप हुंडा मागत असत.मुलाने हुंडा मागणे जितके वाईट ,तितकेच मुलगी विकून पैसे मागणे वाईट नाही काय? यापुढे जाऊन, अनेक तर लग्न करून नियोजन बद्ध फारकत घेतात.त्याचेही पैसे मागतात.किंवा विवाहित मुलगी जावई कडून पळवून नेऊन पुन्हा दुसरीकडे पैसे घेऊन मुलीचे लग्न करतात.या कृतीतील हेतू न कळणे शक्य नाही.तरीही मुलीच्या आईबापाची किंवा तशा मुलींची किव करावी का? मुळीच नाही.काही आई बाप तर लग्न करून मुलीला बळजबरीने माहेरी ठेवून घेतात आणि जावई कडून खावटी मागतात.कोर्टात जातात.हा सुद्धा धंदा आहे.हा वाद नाही, खटला नाही.हा व्यवसाय बनला आहे.वैवाहिक निमित्ताने, लैंगिक निमित्ताने पैसा कमावणे हे कोणत्याही हिंदू संस्कृतीत शोभत नाही.वेशा व्यवसाय जितका निषिद्ध तितकाच हा सुद्धा वेश्याव्यवसाय आहे.पहिला अंधारात चालतो दुसरा उजेडात चालतो, फरक इतकाच.
     समाजाने, कायद्याने स्री पुरुष समान मानले आहेत.दोघांनी लग्न केले.संभोग केला .तर कोणी कोणाला पैसे द्यावेत?नेहमीच पुरूषाने स्त्रीला पैसे द्यावे लागतात.असे का? मुलगी पैसा मागते.बाप पैसा मागतो.वकील पैसा मागतो.न्यायाधिश पैसा देण्याचा आदेश देतो.हे कोणत्या समानतेचे उदाहरण आहे.सेक्स आणि त्यातून सुख किंवा संतान यात तर दोघांचा सहभाग असतो.जेथे बळजबरी किंवा बलात्कार नसतो.तर मग त्यातून ही पैसा काढणे कितपत योग्य आहे? एकाने दुसऱ्याकडून सेक्स केल्याबद्दल पैसा काढणे ,हे वेशात वृत्तीत मोडत नाही काय?हे अनैतिक, असामाजिक नाही काय?
    अनेकदा स्री पुरुष एकत्र राहातात.आपसात प्रेम करतात.सेक्स करतात.आणि काही कारणे बिघडले तर प्रेमिका त्या प्रेमी वर बलात्काराचा, विनयभंगाचा वगैरे वगैरे आरोप करून पोलिसात, कोर्टात खेचते.अनेक वर्षे एकत्र राहिले.एकमेकांवर प्रेम केले,एकमेकांचे चुंबन घेतले तेंव्हा जे झाले तेंव्हा बलात्कार नव्हता.आणि मग,शेवटची प्रणयक्रीडा अचानक बलात्कार कशी काय? हे सुद्धा अनैतिक आहे.आवडले म्हणून पकडले.बिघडले म्हणून सोडले.इतकी साधी प्रक्रिया असतांना येथे सुद्धा पैसा काढणे,हे अनैतिक नाही काय? पण या आर्थिक शोषणाला लैंगिक शोषणाचे लेबल लावून अर्थार्जन करण्याचा प्रकार समाज किंवा पोलिस किंवा न्यायाधीश कसे काय मान्य करतात? यावरून आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत,याचाही अभ्यास केला पाहिजे.या अनैतिक प्रक्रियेला ,कृतीला आफताब नाही,आईबाप जबाबदार आहेत.तरूण मुला मुलींना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत समजणे चुकीचे नाही काय? आईबापांच्या किंवा मुला मुलींच्या अनैतिक व्यवहाराला धार्मिक मुलामा देणे कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या,कायद्याच्या चौकटीत बसत नाही.माणसाने बाईने केंव्हा लग्न करावे, केंव्हा सेक्स करावा,केंव्हा थांबवावा यांच्यावर सरकार नावाच्या संस्थेने नियंत्रण ठेवू नये.ते चुकीचे आहे.अनैतिक आहे.अनैसर्गिक आहे.


..... शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post