भाजपाच्या पत्रपरिषदेवर वर्ध्यातील पत्रकारांचा बहिष्कार... उडाली भंगेरी

भाजपाच्या पत्रपरिषदेवर वर्ध्यातील पत्रकारांचा बहिष्कार


वर्धा : भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष शनिवारी वर्धेत आल्या होत्या. यानिमित्त स्थानिक नेत्यांनी पत्रपरिषदेचे आयोजन केले. यवतमाळ येथे घडलेल्या प्रकारामुळे मात्र वर्ध्यातील पत्रकारांनी या पत्रपरिषदेवर बहिष्कार घातला. पत्रकारांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या स्थानिक नेत्यांची भंबेरी उडाली.

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ शनिवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट व संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेचे येथील विश्रामगृहात आयोजन केले. शुक्रवारी यवतमाळ येथील पत्रपरिषदेत चित्रा वाघ यांनी उपस्थित प्रश्नाला उत्तर न देतां सुपारी घेऊन प्रश्न विचारले जातात. अशा पत्रकारांना बोलावू नये, अशा शब्दात टीका केली होती. यवतमाळात विविध पत्रकार संघटनांनी बहिष्कार टाकला होता. त्याचे पडसाद वर्ध्यातसुद्धा उमटले. वर्धा येथील श्रमिक पत्रकार संघ, मराठी पत्रकार संघ, पत्रकार संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या अध्यक्षांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाऊ नये, असा एकमताने निर्णय घेतला होता.


Post a Comment

Previous Post Next Post