मित्राच्या प्रेयसीला धमकी देऊन मागितली एक लाख खंडणी



नागपूर - नागपूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने मित्राला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासह काही गुप्त गोष्टी सांगितल्या. त्या मित्राने मोबाईलमध्ये आवाज त्या संभाषणाचा रेकॉर्ड केले. ती रेकॉर्डिंग समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन मित्राच्या प्रेयसीला १ लाखाची खंडणी मागितली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. इंद्रदेव घनश्यामी असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला जरीपटक्यात राहते. तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहेत. तिच्या प्रियकराची आरोपी इंद्रदेव घनश्यामी याच्यासोबत मैत्री आहे. दोघेही सोबतच दारू पितात आणि एकमेकांसोबत राहतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सदरमधील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटमध्ये सापडलेल्या दोन रशियन युवतीला नागपुरात आणणाऱ्या दलालाशी घनश्याम याचे संबंध आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post