आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे स्थायी तलाठी दया - गावकऱ्यांची मागणी

मोहझरी:- आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे स्थायी तलाठी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की आरमोरी तालुक्यातील मोहझरी या ठिकाणी स्थायी तलाठी नसल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा काढण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. सध्या तलाठीकडे मोहझरी येथील प्रभार दिलेला आहे. तसेच त्यांच्याकडे देलनवाडी येथील सुद्धा प्रभार आहे. अशा वेळेस या दोन साझ्या मध्ये भरपूर गावे असल्यामुळे तलाठी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आणि अशी परिस्थिती सगळीकडे असल्याचे चित्र दिसत आहे.

 शेतकऱ्यांना महामंडळवर धान विक्री करण्याकरता सातबारा
ची अत्यंत गरज असते परंतु वेळेवर तलाठी येत नसल्यामुळे तलाठी कार्यालयातून शेतकऱ्यांना परत घरी जावे लागत आहे. एकीकडे दहा तारखेपर्यंत सातबारा ऑनलाइन करण्याची तारीख दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी सर्व कामे बाजूला ठेवून सातबारा लवकरात लवकर कसा निघेल आणि ऑनलाईन सातबारा आपला कसा होईल यासाठी शेतकरी धावपळ करत आहे. तसेच ई - पिक पाहणे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरत असल्यामुळे सातबारा
 निघत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

 तलाठ्यांना वेळेवर शासकीय कामे करावी लागत असल्यामुळे 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी तलाठ्याची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन मोहझरी येथे स्थायी तलाठी किंव्हा पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post