भिडेंचा" जातीयवादी बुरखा,पुन्हा महाराष्ट्रासमोर..!

काल परवाच्या भिडेंच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर बराच धुराळा उडाला,टिकली लावावी मगच तुझ्याशी बोलेल असं भिडे महिला पत्रकाराला म्हणाले.बरं ते पहिल्यांदा म्हणालेत का? तर नाही.मागे जेव्हा भिमा कोरेगाव दंगल उसळली होती त्यावेळीही एका महिला पत्रकाराने भिडेंची बाईट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिलाही टिकली लाव असं भिडे म्हणाले होते.तिने बाईटसाठी माती कपाळावर लावली आणि भिडेंनी तिला बाईट दिली. भिडेंची बाईट मिळावी यासाठी माती डोक्यावर लावणाऱ्या महिला पत्रकाराने तेव्हाच जर भिडेंना फाट्यावर मारले असते तर कदाचित दुसऱ्या महिला पत्रकाराला हाच अनुभव आला नसता.खरंतर भिडे इतके लोकप्रिय आहेत का? जेणेकरून त्यांच्या टिकलीबाबतच्या वक्तव्याची इतकी चर्चा केली जातेय? भिडेंना मोठं करण्यात मिडियाचाच मोठा हात आहे.कोरेगावभिमा दंगल झाली. त्यात भिडेंचे आणि एकबोटेंचे नाव आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते.एकबोटेंना त्यावेळी अटक केली गेली मात्र भिडेंची अटक जाणीवपूर्वक टाळली गेली. 

त्याउलट फडणवीसांनी त्यांच्या गोदीत बसलेला मीडिया कामाला लावला.त्या मीडियाने भिडेंची प्रतिमा अधिक उंच करण्याचे काम केले. त्यावेळी वाहिन्यांनी केलेले वार्तांकन काढून पहा. भिडेंनी घातलेल्या दंड बैठकांपासून ते त्यांच्या राहण्याच्या खोलीपर्यंतचे सगळं व्हिडिओ शूटिंग केले गेले. त्यात भिडे कसे सोज्वळ आहेत हेच शोधलं गेलं. त्यावेळी केवळ चित्रलेखाने भिडेंचा खरा चेहरा उघडणारी स्टोरी केली होती. "भिडेंच्या तावडीतून सुटलो त्याची गोष्ट" राजा कांदळकर यांनी ती केली होती.बाकीचा मीडिया केवळ भिडेंच्या आरत्या रचण्यात गुंग होता. त्याचवेळी पहिले टिकलीबाबतचे वक्तव्य आले होते पण भिडेंच्या प्रतिमेच्या प्रकाशात डोळे दिपून गेलेल्या मीडियाला ते दिसले नव्हते.खरंतर भिडेंचे जितके उदारीकरण त्यावेळी मीडिया करत होती त्याच्या १० टक्के जरी त्यांनी चित्रलेखासारखे भिडेंच्या जुन्या सहकाऱ्यांचे अनुभव महाराष्ट्रासमोर मांडले असते तर अवघ्या महाराष्ट्रासमोर भिडेंचा विकृत चेहरा उघडा पडला असता.मीडिया देत असलेली स्पेस पाहता पुढे भिडे अधिकच चेकाळत गेले. त्यांनी मग आंबा वक्तव्य,ज्ञानेश्वर,तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ अशा वाऱ्यावर लाथा मारायला सुरुवात केली. त्यापूर्वी ते महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणत, कधी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द काढत,जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत मूग गिळून गप्प बसून त्याला जणू मूक संमती असल्याचेच दाखवत आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी भिडेंच्या सोबत राहून जे अनुभव घेतलेत ते मीडियाने सोयीस्कर दुर्लक्षित केले. ते सगळं आता जरी मीडियाने सगळ्यांसमोर आणले तरी भिडेंचा जातीयवादी बुरखा फाटायला क्षणाचाही वेळ लागणार नाही..!
संताप..✍🏻सॅंडीभाऊ मेढे 9112601308,मोताळा,जिल्हा बुलडाणा.

Post a Comment

Previous Post Next Post