मोहझरी येथील ग्रामसेवक सोमेश्वर सहारे हे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक

मोहझरी :- आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथे सोमेश्वर सहारे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. आज दिनांक 29 /11/2022 ला हर्ष साखरे  मुख्य संपादक यांनी ग्रामपंचायत कार्यालय मोहझरी भेट दिली असता सोमेश्वर साहारे ग्रामपंचायतमध्ये सकाळी 8.00 उपस्थीत असल्याचे चित्र दिसल्याने समाधान व्यक्त केले.


ग्रामसेवक सोमेश्वर सहारे  यांना 2019-20 आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता. त्यांच्या स्वभाव शांत, संयमी असल्यामुळे ते नेहमी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयमध्ये वेळेच्या अगोदर उपस्थित असतात त्यामुळे नागरिकांचे कामे लवकर करीत असल्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास न होता त्यांचे शासकीय कामे सोमेश्वर साहारे हे पार पाडत असतात.

सदर ग्रामसेवक सोमेश्वर साहारे यांच्याकडे कुलकुली आणि मोहझरी अशा दोन गावाचा प्रभार आहे तरी ते आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून नागरिकांचे कामे करीत असतात. त्यांच्या कार्याला सलाम

असे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक संपूर्ण जिल्ह्यामध्ये कर्तव्याची जाण ठेवून आपले कार्य करावे अशी नागरिकांची भावना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post