माझी दारू कोण पकडते बघून घेईन असे म्हणणाऱ्या दारू विक्रेत्यावर पडला पोलीसांचा छापा

चामोर्शी -:: स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्रीची गोपनीय माहिती मिळाली असता मा. उप विभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात पो. स्टे. चामोर्शीचे पो.उपनिरिक्षक सुधीर साठे, पो.हवा./ सुभाष भोयर, पो.ना./ज्ञानेश्वर लाकडे, पो.शी./ बंडू बारसागडेसह मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजा - चामोर्शी येथील इसम नामे - नागेंद्र सोमनाथ चीचघरे वय - 38 वर्ष याचे राहते घराची दोन पंचासमक्ष दारूबंदी बाबत पाहणी केली असता त्याचे रहाते घरात 90 मिली मापाच्या देशी दारूच्या 1200 नग निपा, प्रती निप अवैध विक्री किंमत 60/- रू. प्रमाणे एकूण 72,000/- रू. चा मुद्देमाल चिल्लर दारू विक्रेत्यांना पुरवठा करण्याचे उद्देशाने बाळगलेला मिळून आल्याने सदरचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला व पो.उप.नी. सुधीर साठे यांचे फिर्याद वरून पो. स्टे. चामोर्शी येथे नमूद आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईमुळे चामोर्शीतील अवैध दारू विक्रेते दणाणले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा. सुभाष भोयर, पो. स्टे. चामोर्शी हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post