डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नामफलकावरून दोन गटात वादंग.

नवरगांव जातीय दंगल घडण्याची शक्यता .

 गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे बौद्ध समाजानी .डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलक लावल्यामुळे दोन गटात जातीय तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे . त्यामुळे त्या गावात पोलिस चौकी बसवावी व गावात कायदा . व .सुव्यवस्था शांतता निर्माण व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी चे नेते मुनिश्वर बोरकर ' भारत मुक्ती मोर्चा चे जर्नाधन तांकसाडे , प्रकाश बांबोळे यांनी तहसिलदार चामोर्शी यांचेकडे निवेदनातुन केली आहे . बौद्ध समाज नवरगांव गिलगांव येथील जागेवर गेल्या सहा वर्षापासुन पंचशिल झेंडा आहे. सदर झेंडा फडकविताना गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवून कार्यक्रम घेतात . सदर झेंड्या जवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला नाव घ्यावे अशी मागणी बौद्ध समाज बांधव नवरगांव यांनी ग्रामसभेच्या ठरावात मंजुर करून घेतले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक लावला त्यामुळे काही जातीयवादी लोकाचा पोटात दुखले व यातूनच वादाची ठिणगी पेटली sDpo . तहसिलदार ' पोटेगाव ठाणेदार . सार्व बाधकाम विभागाचे अधिकारी त्या गावात हजर झाले . गावकर्‍याना समजविण्याचा प्रयत्न करव्यात आला परंतु दोन्ही पार्ट्या मानायला तयार नाही त्यामुळे सात दिवसाची मुदत तहसिलदार चामोर्शी यांनी दिली . बौद्ध बांधवांची कम सख्या बघता तात्पुर्ते पोलिस चौकी घ्यावी व शातता निर्माण करावी अशी मागणी रिपाइचे मुनिश्वर बोरकर सहीत बौद्ध बांधव नवरगाव यांनी केली आहे . तहसिलदार कोणती कारवाई करतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे


Post a Comment

Previous Post Next Post