शिवणी (खुर्द) येथे ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामे करा.. अन्यथा आंदोलन करू

मोहझरी :- आरमोरी तालुक्यातील मोहझरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवनी खुर्द या गावांमध्ये ग्रामपंचायत वतीने अजूनही कुठलेहि विकास कामे केलेली नाही. त्यामुळे गावामध्ये ग्रामपंचायत विषयी नाराजीचे सूर आहे.

मागील अनेक वर्षापासून गावामध्ये नाली, दलित वस्ती सिमेंट रस्ते ,असे अनेक विकासकामे शिवनी खुर्द या गावांमध्ये झालेले नाही. ग्रामपंचायतला दरवर्षी येणारा निधी जातो कुठे हा एक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

शिवनी खुर्द येथील अंगणवाडी इमारत नवीन तयार करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत , शौचालय, व इतर सुख सुविधा शाळेत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.


त्यामुळे शिवनी खुर्द येथे अनेक समस्या असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवनी खुर्द येथील ग्रा.सदस्य श्रीरंग कुमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैशाली टेंभुर्णे, अशोक सहारे, मुरारी सांगोडकर अशा अनेक गावातील नागरिकांनी केला आहे.

या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या अशी प्रमुख मागनी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे अन्यथा ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये आंदोलन करू असा इशारा शिवनी वाशियानी ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post