गवळहेटी व राजुली येथे बिरसा मुंडा जंयती साजरी -


गडचिरोली - जननायक बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम गवळहेटी येथे गोडंवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनिराम दुगा यांचे अध्यक्षतेखाली पार पडला . कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक येरमे सर ' रिपाईचे नेते मुनिश्वर बोरकर ' गडचिरोली हे होते . तर प्रमुख पाहुणे शिवाजी नरोटे ' गणपत कुळमेथे . पत्रुजी सिडाम ' दिवाकर फुलझेले 'अभिमन्यु सुरपाम, विनोद मडावी आदी होते . मनिराम दुगा याचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . तर कार्यक्रमात गोंडी नुत्य सादर करण्यात आले . याप्रसंगी मनिराम दुगा ' मुनिश्वर बोरकर / येरमे सर ' विनोद मडावी आदींनी . जननायक बिरसा मुंडा याच्या जिवनावर प्रकाश टाकला . रात्रौ भोजनदान करण्यात आले . . कार्यक्रमास शिवाजी नरोटे 'अभिमन्यु सुरपाम, कुमरे कुळमेथे ' वंदना नरोटे ' कांन्ता हलामी आदी सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .




जननायक बरसा मुंडा जयंती राजुली येथे संपन्न -

गडचिरोली - क्रांतिकारी बिरसा मुंडा जयंती राजुली - पोटेगांव आदिवासी गोटुल भुमी येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनिराम दुगा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रभुदास येरमे .यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉ . देवराव होळी ' रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ' प्रभुदास .येरमे सर ' . आदिवासी विकास युवा .परिषदेचे विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष विनोद मडावी ' सरपंच मनोज पा . पोटावी - डॉ . विजय रामटेके ' दिवाकर फुलझेले ' शिवाजी नरोटे ' आदी लाभाले होते . याप्रसंगी प्रा . मुनिश्वर बोरकर म्हणाले की ' आदिवासी हे मु ळनिवासी आहेत . हे बिरसा मुंडा यांनी सांगीतले अश्या क्रातीकारी बिरसाची मुंडा .ची .जयंती आज साजरी करण्यात येत आहे . सर्व .आदिवासी बांधवानी डॉ बाबासाहेब आंबेडकराचे विचार व संविधान विसरता कामा नये . याप्रसंगी येरमे यांनी बिरसा मुंडा ' पारि कुमार लिंगो ' यांच्या विषयी विश्वृत माहीती दिली . याप्रसंगी आमदार डॉ . देवराव होळी म्हणाले की ' आज आदिवासीचा गौरव दिवश आणि आझादी का अमृत महोत्सव . राष्ट्रप्रेम या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत . बिरसा मुंडा हे क्रांतीकारी होते म्हणुनच ते इग्रजांच्या विरोधात लढले . आदिवासी बांधवांनी अन्याय , अत्याचार सहन केला तरीही आज आदिवासी दारिद्रात खिचपत पडले आहोत . त्यांना बाहेर काढलं पाहीजे . जल जंगल जमीनी हे हक्क मिळाले पाहीजे . असे आमदार डॉ . होळी यांनी सांगितले . याप्रंसगी गोगपाचे मनिराम दुगा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की ' आज बिरसा मुंडा ची जयंती साजरी करतांना त्याचे विचार - आचरणात आणावे तरच आदिवासी चे यात हित आहे . कार्यक्रमचे संचलन विनोद मडावी आभार हितराज यांनी मानले . कार्यक्रमास ' किसन हलामी गणपत कुळमेथे ' कांता हलामी ' वंदना नरोटे ' पत्रुजी सिडाम ' सदिप पोटावी विट्ठल कुळमेथे ' नरेश नरोटे ' राजु तुलावी ' पुरुषोतम सिडाम ' पत्रुजी मडावी आदी सहीत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post