एखाद्या स्त्रीला विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, त्यापद्धतीनं बोलणे, कामूक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे, याला विनयभंग म्हणता येईल.

 *विनयभंग म्हणजे काय? गुन्हा सिद्ध झाल्यास किती शिक्षा होते?*

         
कायद्याचं बोला; भाग ४_ 

💁🏻‍♂️ नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, विनयभंग म्हणजे काय? भारतीय दंड संहितेत कोणती कलमं विनयभंगाशी संबंधित आहेत ? जाणून घ्या...

🤵🏻‍♂ ज्येष्ठ वकील असीम सरोदे सांगतात, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, या प्रकाराला विनयभंग असं म्हटलं जातं. आणि भारतीय दंड संहितेत कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो.

👇🏻 *विनयभंगाच्या बाबतीत खालीलप्रमाणे अनेक उप-कलम आहे..* 

☞ *"कलम 354"* अंतर्गत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास आणि ते सिद्ध झाल्यास 1 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

☞ *'कलम 354-अ'* अंतर्गत, एखाद्या महिलेशी शारीरिक जवळीक साधण्यासाठी बळजबरी करणे, याचा समावेश विनयभंगामध्ये होतो. यापद्धतीचा गुन्हा शिक्षा झाल्यास 3 वर्षांची शिक्षा होते.

☞ *'कलम 354-ब'* अंतर्गत, एखाद्या महिलाचा विनयभंग करण्यासाठी तिच्यावर हल्ला केल्यास आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 4 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते."

🗣️ सरोदे पुढे म्हणाले की, "कायद्यात उद्देश अत्यंत महत्त्वाचा असतो. एखाद्या ठरावीक उद्देशाच्या दृष्टीने कृती केली, तर तो गुन्हा ठरू शकतो." "विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये तक्रारदार स्त्रीला व्यक्तिगतरित्या काय वाटलं, यावर खूप काही अवलंबून असतं. पण, आव्हाड यांच्या प्रकरणाच्या बाबतीत गर्दीत एखाद्याला बाजूला सारण्यासाठी नुसतं अंगाला हात लावणं म्हणजे विनयभंग होत नाही."

▪️तसेच एखाद्या स्त्रीला विकृत स्पर्श करणे, चोरून नजर ठेवणे, त्यापद्धतीनं बोलणे, कामूक भावनेने बोलणे किंवा तसा टोमणा मारणे, मन दुखावेल असे बोलणे किंवा कृती करणे, याला विनयभंग म्हणता येईल.

▪️किंवा "एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे, बोलणे, शब्द उच्चारणे किंवा करणे, एखादी गोष्ट किंवा वस्तू दाखवणे, महिलेच्या खासगीपणाचे उल्लंघन करणारे वर्तन करणे, अंगविक्षेप करणे, एकसारखे अश्लील शब्द वापरणे अशा गोष्टी विनयभंगाखाली येऊ शकतात."

Post a Comment

Previous Post Next Post