पत्रकार विलास मोहिनकर यांना जीवे मारण्याच्या नादात चिमूर पोलीस स्टेशन येथे भाजपाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल


चिमूर : - दिनांक.०९/११/२०२२ चिमूर वरून गोरवट येथे दि.०८/११/२०२२ ला नाटकाच्या उदघाटन प्रसंगी पत्रकार श्रीहरी उर्फ बालू सातपुते तसेच जावेद पठाण व चिमूर येथील पब्लिक पंचनामा साप्ताहिक वृत्तपत्राचे उप संपादक विलास मोहिनकर हे जात असतांना त्यांच्या ईनोव्हा कार क्रमांक. MH 48 A 4853 चा भाजपा चे कार्यकर्ते गोलू उर्फ हर्षद भरडकर यांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट गाडी क्रमांक.MH 36 H 3099 ने चिमूर ते नेरी असा भरधाव वेगाने पाठलाग करून कट मारीत अपघात घडवून जीवे मारण्याचा कृत्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला.



त्याचवेळी विलास मोहिनकर यांनी 112 या पोलीस टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून ऑनलाईन तक्रार नोंदविली आणि चिमूर येथील पोलीस पथक तात्काळ मदतीला धावून आले.या अगोदर सुद्धा काही दिवसा अगोदर भाजपा चे गोलू भरडकर तसेच भूषण सातपुते यांच्यावर पत्रकार विलास मोहिनकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल अदखल पात्र गुन्हा दाखल असतांना पुन्हा अपघात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला आणि याची तक्रार चिमूर पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आली.कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम भारतीय दंड संहिता १८६० कलम २७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने करीत आहे. या सर्व प्रकारामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post