ते ओझे नाही... तो माझा भाऊ आहे!!


जापान मध्ये #युद्धा_दरम्यान हा लहान मुलगा आपल्या लहान मृत भावाला दफन करण्यासाठी पाठीवर बांधून घेऊन जात होता. त्यावेळी एका सैनिकाने त्याला पाहताच थांबविले,
सैनिक: बाळा तू खूप थकलेला दिसतोयस, पाठीवर हे ओझे घेऊन तू जास्त दूर चालू शकणार नाहीस. म्हणून तू पाठीवर बांधलेल्या या मृत शरीराला इथेच सोडून पुढे सुरक्षित जागेवर निघून जा.
तेव्हा त्या लहानग्या मुलाने उत्तर दिले,
मुलगा: तेओझे नाही... तो माझा भाऊ आहे!!
या उत्तरावर सैनिक अंतर्मुख झाला आणि हमसून रडू लागला. तेव्हापासून हा फोटो जपानमध्ये एकतेचे प्रतीक बनलेला आहे.
'हे ओझे नाही तर हा माझा भाऊ आहे'... हे वाक्य आपल्या आयुष्यात एक आदर्श विचार आणि आचार बनावा याची आज नितांत गरज आहे.
"जर तो खचला असेल तर पुन्हा उभारी घेण्यासाठी तुमचा हात पुढे करा, तो कमजोर झाला असेल तर त्याला आधार द्या, त्याने काही चुका केल्या असतील तर त्याला माफ करा आणि जर परिस्थिती आणि जगाने लाथाडले असेल तर त्याला उचलून तुमच्या खांद्यावर घ्या....
कारण तो ओझं नाही तर तो तुमचा #भाऊ आहे!!!"👆👆👆

Post a Comment

Previous Post Next Post