देशात वाघ चीत्यांची संख्या वाढवू नका- दलित मित्र प्रा.डी.के.मेश्राम

दररोज वर्तमान पत्र उघडल्या बरोबर किव्हा टिव्ही ऑन केल्या बरोबर एकणा एक कुठे नर भक्षिनी माणसाचा बळी घेतल्याची घटना वाचायला / पाहायला मिळते. वाचून मन सुत्र होतो. महापुरुषांनी क्रांतिकारकांनी बलिदान देऊन माणूस सुखी समृद्ध होऊन कोणाच्याहीदहशतीखाली न वावरता निर्भय पर्ने जगला पाहिजे. म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले स्वराज्य निर्माण केले परंतु स्वातंत्र्याच्या चुकीच्या अर्थ लावून सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे राज्य समजून एक एक चुकीचे निर्णय घेऊन गोरगरीब माणसांच्या बळी देणे सुरू करून दहशतीच्या खाईत लोटत आहेत. ग्रामीण भागात जीव मुठीत धरून जनता जगत आहेत. या देशाचा मूळ घटक माणूस हा केंद्र बिंदू या माणसाला निर्भय पर्ने जगता यावे म्हणून कायद्याची निर्मिती केली त्याचबरोबर वन्य जीव संरक्षण गोधना कडे दुर्लक्ष केले आणि वन्य जीवा मधील वाघ चीत्याची फाजील लाड पुरवून कायद्याची ढाल वापरून माणसाच्या जीवावर उठले देशातल्या सामान्य माणसाला कधी विमानाने प्रवास करण्याचे भाग्य लागतं नाही. कधी संधी मिळत नाही. परंतु आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी नामिबियातून (परदेशातून) आठ चीत्यांना विमाना द्वारे (स्पेशल रंगरंगोटी केलेल्या) देशात आणून देश विदेशात खूप मोठी प्रसिद्धी मिळवून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.


इकडे भारतातील अनेक राज्यातील पाळीव जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले काही मृत्यू मुखी पडले / पडत आहेत. त्यांना वाचाविण्याकरिता राज्यात लसीचा तुटवडा आहे मात्र चीत्यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल लस त्यांना ३० दिवस वारंटाइन करून माणसापेक्षा ही वैद्यकिय सेवा पुरविल्या गेल्या जात आहेत. त्यात कोट्यवधीचा शासनाच्या तिजोरीतून पैसा खर्च केल्या जात आहे. त्यात फायदे तोटे किती याचे सुजाण मंडळींनी मूल्यमापन करावे.

महत्त्वाचा मुद्दा असा की साप, विंचू, वाघ, सिन्ह, चित्ता हे आपले मित्र होऊच शकत नाही. शत्रू ते शत्रूच कारण वाघ चित्ते बिबटे वगेरे रात्री झोपलेल्या निष्पाप मानवी जीवावरच नाही तर पाळीव प्राण्यांवर हल्ला करून त्यांच्या नरडीचा घोट घेतात. गरीब बिचारे गुराखी आपल्या गाई म्हशी शेळ्या जंगलात चरायला नेतात त्यांच्यावर सुद्धा हल्ला करून त्यांचे रक्त पितात.

शेतकरी आपल्या शेतावर पिकाची पाहणी देखभाल करायला, कामे करायला जातात त्यांच्या
वर सुद्धा हल्ला करून त्यांना फाडून खातात. कुणी वाटसरू दुचाकी कीचा सायकल ने प्रवास करतात.
त्यांचा वर सुद्धा झडप घेऊन ठार केल्याच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे सर्वत्र माणसावर वाघाची दहशत निर्माण झाली आहे लोकांनी शेतावर जाणे बंद केले मजुरांनी एकल मजुरीवर जने बंद केले. एकंदरीत या वाघांचाच धावू निर्माण झाला आहे.

खऱ्या अर्थाने या वाघांचा आपल्याला उपाय काय? कधी यांना बैला सारखे नांगराला जुपले जात नाही म्हणजे शेतकऱ्यांचा अजिबात कामाचे नाही. किंव्हा त्यांचे अवयवांचाही माणसाला फायदा नाही तेव्हा

ही जात नामशेष झाली तरी काहीच फरक पडणार नाही. डायनासोर लुप्त झाले त्यांचा काही फरक पडला का ? तरी मात्र वाघाचे संरक्षण संवर्धन मात्र ज्या गोमाता आपल्याला दूध देतात गोमूत्र शेन शेतीच्या कामात येते म्हशी पासून दूध मिळते त्यांचा चामड्या पासून विविध उपयोगी च्या वस्तू निर्माण केल्या जातात तरी मात्र त्यांचे संवर्धन केले जात नाही त्यांना उतारवयात कत्तल खाण्याची वाट दाखवली जाते त्या कडे मात्र सरकारचे दुर्लक्ष कुचकामी असलेल्या वाघांची संवर्धन अशी सरकारची विरोधा भासी भूमिका आहे.

त्या प्राण्यांना तृणभक्षी प्रान्यांची मेजवानी (बलिदान) काम पाप केले त्यात ससा, हरीण, चित्तळ, सांबर, नीलगाय व इतर तृणभक्षी प्राण्यांनी त्यांच्या अरण्यात या वाघांना मोकळे सोडले जाते ते प्राणी केव्हाही मानव प्राण्यांना इजा पोचवत नाही तरी पात्र त्यांना वाघाच्या हवाली केले जाते आणि वाघ विबत सिंह यांना पुरेपूर संरक्षण दिले जाते.

तेव्हा विनाकारण शासनाच्या तिजोरीवर भार टाकणारे हे चुकीचे धोरण बंद करून माणसाचे रक्त पिणाऱ्या वाघांना दिसेल तिथे ठार मारण्याचे आदेश द्यावे. व पुढे अश्या माणसाची शिकार करणाऱ्या चित्ते वाघांची संख्या वाढवू नये. अशी ब्रम्हपुरी पेठ वार्डातील दलित मित्र प्रा. डी. के. मेश्राम यांनी प्रसिध्दी पत्र द्वारे मागणी केली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post