गोदी मीडियाची पोलखोल करणारे एनडीटीव्ही’चे प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी दिला राजीनामा



दिल्ली:- रवीश कुमार ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला होता. त्यातच आता ‘एनडीटीव्ही’चे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रवीश कुमार यांनी राजीनामा दिल्याची माहिती, ‘एनडीटीव्ही’कडून बुधवारी एका ईमेलद्वारे जाहीर करण्यात आली. रवीश कुमार यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करत हे यशाचं शिखर गाठलं आहे. १९९६ पासून ते ‘एनडीव्हीशी’ जोडले गेले होते. समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती यांची अचूक नस पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. ‘रवीश की रिपोर्ट,’ ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न सातत्याने ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून रवीश कुमार मांडायचे. त्यानिमित्त रवीश कुमार यांना सर्वोच्च ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

राजीनाम्यानंतर ‘एनडीटीव्ही’च्या अध्यक्षा सुपर्णा सिंग यांनी सांगितलं, “रवीश कुमार यांच्यासारख्या काही पत्रकारांनी लोकांवर प्रभाव टाकला आहे. हे लोकांकडून त्यांना मिळत असलेल्या पाठिंब्यातून समजते. भारतात आणि आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठित पुरस्कार रवीश कुमार यांना मिळाले आहेत. रवीश कुमार यांचे ‘एनडीटीव्ही’साठी खूप मोठे योगदान आहे. नवीन सुरुवात करताना ते यशस्वी होतील,” असेही सुपर्णा सिंग म्हणाल्या.

एनडीटीव्ही’ या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला. याबाबत कंपनीने सोमवारी ‘सेबी’ला तसे पत्र दिलं आहे. संस्थापकांचा समावेश असलेल्या या प्रवर्तक कंपनीने अदानी समूहाला कंपनीच्या मालकीचा काही भाग विकला आहे. अधिग्रहणकर्त्यां अदानी समूहाच्या माध्यम क्षेत्रात विस्ताराच्या मनसुब्यांना मूर्तरूप मिळण्याच्या दिशेने हे पाहिले पाऊल मानले जाते.

प्रणोय रॉय आणि राधिका रॉय यांचाही राजीनामाNDTV चे प्रवर्तक आणि संचालक प्रणय रॉय (Prannoy Roy) आणि राधिका रॉय यांनी (Radhika Roy) यांनी नुकताच आपल्या पदांचा राजीनामा दिला. कंपनीकडूनही दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सुदिप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि संथिल समिया चंगलवारयान यांना तत्काळ NDTVचं संचालक बनवण्यात आलं. आरआरपीआर होल्डिंगच्या शेअर्सच्या हस्तांतरणामुळं अदानी समूहाला (Adani Group) एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. यांसह अदानी समूहाकडून 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर दिली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post