मी तुमच्या कायदयावर मुततो अन् तुमचा कायदा जाळतो - अश्या म्हणणाऱ्या सरपंचावर तत्काळ कारवाई करा- भिम आर्मी

सिंदेवाही : चिमुर तालुक्यातील वाहणगाव मधील सरपंच प्रशांत कोल्हे याची मी कायद्यावर मुततो व जाळतो असे व्यक्तव्य करणारी रेकॉर्डिंग व्हाट्स उप द्वारे वायरल झाली, आणी या बाबत भीम आर्मी संघटना सिंदेवाही आक्रमक होऊन अश्या बेताल व्यक्तव करणाऱ्या सरपंच प्रशांत कोल्हे याच्या विरोधात कारवाई ची मागणी करण्याचे निवेदन पोलीस स्टेशन सिंदेवाही इथे देण्यात आले, तसेच या निवेदनातुन तहसीलदार सिंदेवाही यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांना सुद्धा देण्यात आले, सरपंच प्रशांत कोल्हे हा गावाचा विकास करण्याऐवजी स्वतःची प्रसिद्धी करण्याचा जास्त प्रयत्न करीत असतो, काही दिवसापूर्वी गावातील नागरिकांना भडकवून बेकायदेशीर आंदोलन करायला लावून चार तास चक्का जाम केले होते.


पण स्थानिक प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत कुठलीच करावाही केली नसल्याने प्रशांत कोल्हे याची हिम्मत वाढली, कायदा आपला काहीच बिघडवू शकत नाही असा त्याचा भ्रम आहे, आणी ते सत्य पण आहे कारण गावातील नागरिकासाठी आलेल्या शासकीय अन्यधान्या चा ट्रक त्याने गावातून परत पाठविला. पन सरपंच असल्याच्या कारणाने किंवा आणखी कोणत्या कारणाने पण प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने प्रशांत कोल्हे ला कायदा तुडविण्याची सवय झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आज प्रशांत कोल्हे नावाचा व्यक्ती कायद्यावर मुतण्याची व जाळण्याचे वक्तव्य करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post