ड्रायव्हरने असा गिअर टाकला की प्रेमात पडली श्रीमंत पोरगी; तिच्याशी लग्न करून झाला करोडपतीचा घरजावई

कराची, 01 नोव्हेंबर : एखादी व्यक्ती गाडी चांगली चालवते म्हणून तुम्ही त्या व्यक्तीचं कौतुक केलं असेल. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग स्किल किंबहुना त्याच्या गिअर टाकण्याच्या पद्धतीवर एक तरुणी इतकी फिदा झाली की त्या ड्रायव्हरच्या प्रेमातच पडली. तिने त्याच्याशी लग्नही केलं आणि साधा ड्रायव्हर करोडपतींचा घरजवाई झाला. पाकिस्तानातील ही अनोखी लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे.

श्रीमंत मुलगी पटावी असं कित्येक तरुणांना वाटतं. यासाठी हे वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी किती पापड बेलावे लागतात हे काही तरुणांना माहिती असेलच. पण एका साध्या ड्रायव्हरने फक्त एका गिअरवर श्रीमंत मुलगी पटवली आहे. जिथं हा तरुण ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्याच मालकाची मुलगी त्याच्या प्रेमात पडली आणि दोघांनी लग्न केलं.

तेव्हा तिने ड्रायव्हरला कारचा गिअर बदलताना पाहिलं तेव्हा तिला त्याचा अंदाज इतका आवडला आणि ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली. तिने सांगितलं की, तिला गाडी शिकताना बऱ्याचदा ड्रायव्हरचा हात धरण्याची इच्छा झाली होती.




शेवटी तिने आपण लग्न केलं तर याच्याशीच करू असं तिनं ठरवलं आणि तिने तसंच केलं. दोघांनी लग्न केलं. ड्रायव्हर तिच्याकडे घरजावई म्हणून राहू लागला. एकमेकांसोबत लग्न करून दोघंही आनंदात आहेत आणि सुखाने संसार करत आहेत. तरुणीने सांगितलं की तिला आपल्या नवऱ्याच्या गिअर बदलण्याच्या स्टाईलशिवाय त्याच्या सर्व सवयी आवडतात.

Post a Comment

Previous Post Next Post