घरबसल्या बनवू शकता राशन कार्ड, सरकार 2023 मध्ये सुद्धा देणार मोफत धान्य!*

━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━
भारत:- 💁🏻‍♂️ 2023 मध्येही सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत राशन देणार आहे. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत रेशन एक वर्षासाठी वाढवले ​​आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका (Online ration card) असणे आवश्यक आहे. रेशनकार्ड हे आपल्या ओळखीचे महत्त्वाचे दस्तऐवज असून, मोफत रेशन मिळवण्यासाठी ते आवश्यक आहे. त्याशिवाय सरकारच्या मोफत राशन योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन सहज बनवू शकता.

📙 *घरबसल्या असे काढा रेशनकार्ड-*
1) जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर http://mahafood.gov.in/ वेबसाइटला भेट द्या. होमपेजवर लॉग इन करा आणि ‘NFSA 2013 अप्लिकेशन फॉर्म’ वर क्लिक करा.
2) ऑनलाईन पोर्टलवर लॉग इन करा.
3) तिथे एनएफएसए 2013 अर्ज उघडा.
4) अर्जदाराशी संबंधित विचारलेली सर्व माहिती नमूद करा.
5) आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वीज बिल, फोन बिल यांसारखा ओळखीचा पुरावा आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो पोर्टलवर अपलोड करा.
6) अर्जाची फी जमा केल्यानंतर 'सबमिट' या पर्यायावर क्लिक करा.
7) अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आपण दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल.
8) सर्व तपशील बरोबर आढळल्यानंतर आपल्याला रेशन कार्ड दिलं जाईल.

🍛 *डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन*
केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुक्रमे 3,2,1 रुपये प्रति किलो दराने पुरवते. सरकारने ठरवले आहे की डिसेंबर 2023 पर्यंत ते पूर्णपणे मोफत असेल.

☎️ *रेशनचं मोफत धान्य मिळवण्यात अडचण येतीये? 'महाराष्ट्रातील ग्राहक' क्रमांकांवर करा तक्रार...*

📍 *महाराष्ट्र- 1800224950*.

Post a Comment

Previous Post Next Post