अन् इथे 28 जण बसले रेल्वे मोजत...

तामिळनाडू:- फसवणुकीचा एक अजब प्रकार तामिळनाडू येथे उघडकीला आला असून नोकरीच्या आमिषाने तामिळनाडू येथील 28 तरुणांना नवी दिल्ली येथे आणून रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर तब्बल एक महिना कोणती रेल्वे येते आणि जाते याचा अभ्यास करण्यास सांगितला मात्र प्रत्यक्षात ही नोकरी नसून फसवणूकच करण्यात आहे असे या तरुणांना लक्षात आले आहे. सर्वच कारभार गोलमाल असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना जाणीव झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तामिळनाडू येथील हे बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात होते त्यावेळी एका संस्थेच्या माध्यमातून त्यांना रेल्वेमध्ये तिकीट परीक्षक, वाहतूक सहाय्यक लिपिक अशा पदांसाठी नोकरीच्या जागा आहेत असे सांगण्यात आले होते. नोकरीसाठी म्हणून त्यांच्याकडून दोन लाखांपासून तब्बल वीस लाखांपर्यंत रक्कम देखील उकळली होती त्यानंतर त्यांना नवी दिल्ली येथे घेऊन जाण्यात आले आणि त्यानंतर रेल्वे स्थानकावर बसून गाड्यांची नोंद ठेवण्यास भाग पाडले. आपल्या ट्रेनिंगचा हा भाग असावा असे समजून 28 जणांनी एक महिना हे काम केले.

धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांना नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढणारा व्यक्ती हा माजी सैनिक असून सुब्बू सामी असे त्याचे नाव आहे. आपण फक्त मध्यस्थ म्हणून काम करत होतो मात्र आपल्याला हा प्रकार फसवणुकीचा आहे हे माहिती नव्हते असा त्यांनी दावा केला आहे. आपण हे पैसे विकास राणा नावाच्या एका व्यक्तीला दिलेले आहेत असे त्यांनी म्हटले असून राणा उत्तर रेल्वे कार्यालयात उपसंचालक म्हणून काम करतो असे त्याने आपल्याला सांगितले होते असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post