दोबुर" धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष..


रमेश बामनकर गडचिरोली 
 

    🔵 पर्यटकांचे खास आकर्षण असणारा

 🔵 भामरागड तालुक्यातील दोबुर धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष .....

  गडचिरोली :-   दोबुर धबधबा पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष
पर्यटकांचे खास आकर्षण असणारा भामरागड तालुक्यातील दोबुर धबधबा वाहायला सुरू झाली आहे. मात्र वर्षानुवर्ष या पर्यटन स्थळांच्या विकासाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. भामरागड पर्वत रांगेतून उगम पावणारा तीन नद्याचा सागंम विदर्भात व गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध आहेच. परंतु दोबुर येथील धबधबा हा भामरागड शेजारील गावातील पर्यटकांचे खास आकर्षण आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, युवकांची पाऊले या पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी धबधबा बाराही महिने वाहण्यास सुरू असते. यावर्षी "दोबुर" या धबधबा ला खुप छान प्रतिक्रिया दिल्या. अश्या सुंदर धबधबा कडे जाण्याचा मार्ग ही मुर्माचा व दगडाचा असुन सुद्धा अश्या परिस्थितीत स्थानिक पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. अनेक जण आपल्या परिवारासह  दोबुर कडे पाहण्या करीता दिसून येत आहेत. जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा हेमलकसा समोरासमोर भामरागड तालुक्यातील दोबुर धबधबा हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण असताना या पर्यटन स्थळाचा विकास अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. भामरागड शहरापासून सुमारे १८ ते २०  किमी अंतरावर दोबुर गावातील डोंगर पोखरून मदोमध दोबुर हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून कोणताही विकास झाला नसल्याने येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय  त्रास सहन करावा लागत आहे . धबधब्यापर्यंत पर्यटकांना सहज पोहचायला मदत व्हावी यासाठी साधे दिशादर्शक फलकदेखील नसल्याची स्थिती आहे. धबधब्यापर्यंत पोहचायला चांगल्या स्थितीतील रस्तादेखील ,सोयीसुविधासह या धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजनादेखील नाही. या धबधब्यात अनेक तरूणांचे पाहण्याकरिता गेले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसुविधासह सुरक्षिततेच्या दृष्टीने यापर्यटन स्थळाचा विकास करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, हे पर्यटनस्थळ वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने  वन विभागाच्या वतीने या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी दोबुर धबधबा पर्यटनस्थळ विकासाचा प्रस्ताव तयार करून राज्याचे  वनसंरक्षक यांच्याकडे पाठपुरावा करून या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधी प्रस्तावाला वनविभागाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली पाहिजे.  



दोबुर या पर्यटनाची स्वच्छता करणारे "प्रतिमा बहादुर एक्का" असे नागरिकाचे नाव आहे त्यांचे म्हणणे आहे की स्थळाच्या विकास झाल्यास न झल्यास गावतील नागरिक कधी पर्यंत लक्ष देऊ या कडे ग्रामपंचायत / वन विभागाने याचा विचार केला पाहिजे आणि स्थानिकांनादेखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असे दोबुर गावातील नागरिकाचे मत आहे  लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी पर्यटन विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post