मोदी सरकार शेतकर्यांना दिलेल्या उत्पन्न दुप्पट करण्यांच्या आश्वासनाबद्दल कां बोलत नाही?- डॅा. नामदेव किरसान.


             
               सत्तेत येण्यापूर्वी शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट भाव देण्याचे व शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यांचे आश्वासन भाजप व नरेन्द्र मोदी यांनी स्वत: दिले होते. परंतु सत्तेत येताच या आश्वासनांचा व अनेक अशा आश्वासनांचा विसर मोदी सरकारला पडला. त्याबद्दल अवाक्षर काढायला ते तयार नाहित. भाजपचे सर्व नेते मुग गिळून बसले आहेत. गेल्या आठ वर्षात एकही आश्वासनपुर्ती केली नाही. या उलट शेतकर्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत भिक म्हणुन वर्षाला सहा हजार रुपये ध्यायचे व खतांच्या, बियानांच्या व पेस्टीसाईडच्या किमंतीत भरमसाठ वाढ करुन शेतकर्यांच्या खिशातून जास्तीचे दहा हजार रुपये काढुन घ्यायचे असा तुघलकी कारभार सुरु आहे. खताच्या किमंती दुप्पट करुन पांच किलो वजन कमी करुन शेतकर्यांची लुट चालविलेली आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश कॅांग्रेस कमिटी महासचिव डॅा. नामदेव किरसान यांनी व्यक्त केले. 
               मौजा किरमिटी (मेंन्ढा) ता. नागभिड जि. चंद्रपुर येथे “पंख तुटलेले पाखरु” या नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष चिमुर विधानसभा समन्वयक डॅा. सतिष वारजुकर, उदघाटक नागभिड न.प. गटनेते दिनेशभाऊ गांवडे, सहउदघाटक माजी सभापती प्रफुल्लभाऊ खापर्डे, प्रमुख पाहुणे युवक कॅांग्रेस तालुकाध्यक्ष सौरभ भाऊ मुळे, माजी नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन, माजी पं.स. सदस्य रोशनभाऊ ढोक, उपसरपंच पुरुषोत्तमजी बगमारे, माजी सरपंच मौसी रामकृष्णजी देशमुख, मुरलीधर पाटील मोरांडे, गज्जुभाऊ उरकुडे, सरपंच बालापुर कमलाकरजी ठवरे, पंकजजी झा व गणमान्य मंडळी. यावेळी अनेकांनी कॅांग्रेस प्रवेश केला. नाट्यप्रयोगाला मोठ्यासंख्येने प्रेक्षक उपस्थीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post