दप्तर मुक्त शनिवार व सरत्या वर्षाला निरोप*



     जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा केशोरी येथे दप्तर मुक्त शनिवार व सरत्या वर्षाला निरोप समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सरत्या वर्षाला शानदार निरोप दिला.
     मुख्याध्यापक पी एन जगझापे यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक गीता बडोले, हेमंत पवनकर, पवन कुमार कोहळे, गुंपेस बीसेन व भावना नंदेश्वर यांच्या देखरेखी खाली प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कथा, कविता, लोकगीते, गोंडी गीते, देशभक्तीपर गीत सादर करून सरत्या वर्षाला रंगा रंग निरोप दिला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व विद्यार्थी सज्ज होऊन नवीन वर्षात काहीतरी करूया अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. गेलेल्या वर्षातील सर्व चुका दुरुस्त करून नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करू व नित्य नियमित अभ्यास करून आणि आपली प्रगती साध्य करू असे विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.



         कार्यक्रमाला उपस्थित कैलास शेंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तथा सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post