लग्नाला मुलगी मिळत नसल्याने २२ वर्षे तरुणाची आत्महत्या.

सोलापूर : जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोरोली येथे लग्न जमत नसल्या कारणाने २२ वर्षे तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे भीमाशंकर काशिनाथ म्हमाने वय २२ राहणार कोरवली तालुका मोहोळ असे मयत तरुणाचे नाव आहे याबाबत कामती पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरवली येथील भीमाशंकर म्हमाने या तरुणांने गुरुवार दिनांक २९ सायंकाळी ७ ते ११ दरम्यान शिवानंद पाटील यांच्या शेतातील चिंचेच्या झाडास ड्रिपच्या पाईप ने गळ फास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हा तरुण आपली डी फार्मसी शिक्षण पूर्ण होऊन ही लग्न होत नसल्याने लग्नास मुलगी मिळत नसल्याने निराश झाला होता त्या नैराश्यातून तो सायंकाळी सातच्या दरम्यान जेवण करून घरातून बाहेर पडला होता रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबीयांना काळजी वाटू लागल्याने त्याने कामती पोलिसांना कळविले कामती पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अंकुश माने साहेब व अन्य पोलीस कर्मचारी यांनी त्यांचा तात्काळ मोबाईल लोकेशन ट्रेस करून ते लोकेशन शिवानंद पाटील यांच्या शेतातील असल्याचे समजले नातेवाईक व पोलिसांनी लगेच तेथे जाऊन तपासणी केली असता तेथील चिंचेच्या झाडास ठिबक सिंचन पाईपने भीमाशंकर मामाने हा गळफास घेतल्याचे आढळून आले यामुळे मोहोळ तालुक्यातील कोरवली गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post