मत्स्योद्योगाला गडचिरोली जिल्ह्यात मोठा वाव - मच्छिमारी सहकारी संस्था स्थापन करा - आमदार भाई जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी



मत्स्योद्योगाला गडचिरोली जिल्ह्यात मोठा वाव

- मच्छिमारी सहकारी संस्था स्थापन करा

- आमदार भाई जयंत पाटील यांची विधान परिषदेत मागणी


गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला नद्यांची मोठी लांबी लाभलेली असून या नद्यांमधील मच्छी चविष्ट आहे. ती बाहेर निर्यात करुन मोठ्या रोजगार निर्मितीची संधी आहे. त्यासाठी आदिवासी आणि मच्छिमारांच्या सहकारी संस्था नव्याने स्थापन करा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.

व्हिडियो 
👇👇👇👇👇


नियम ९३ अन्वये सुरजागड खाणीबाबत पेसा आणि वनहक्क कायद्यांचे स्थानिकांचे अधिकार डावलले जात असल्याच्या आणि रोजगाराच्या मुद्यावर बोलतांना आमदार भाई जयंत पाटील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना म्हणाले की, आर्थिक तरतूद करुन स्थानिक मच्छीमारांच्या नव्याने सहकारी संस्था स्थापन झाल्या तर तलाव आणि नद्यांमधील मच्छी आणि झिंग्यांचे बाहेर निर्यात करता येईल. त्यातुन नद्यांचा उपयोग होवून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशीही यावेळी आमदार भाई जयंत पाटील यांनी सभागृहाला विनंती केली.

Post a Comment

Previous Post Next Post