हत्तींनी घातला नवेझरी येथे प्रचंड धुमाकूळ

एजाज पठाण प्रतिनिधि कुरखेडा 

कुरखेडा :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरखेडा तालुक्यातील अंगारा, नवेझरी येथे आज पहाटे तीन वाजता रानटी हत्ती येऊन गावात धुमाकूळ घातला.



सदर हत्ती नवेझरी येतील हलामी ,नरोटे यांच्या घरात घुसून त्यांच्या घराची तसेच इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान केली. घरात ठेवलेले धान्य , तांदुळ सुद्धा त्यांनी पूर्णपणे आपल्या सोंडेने धान घराबाहेर फेकले अशी माहिती प्राप्त झालेली आहे .






त्यामुळे हलामी, नरोटे कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झालेली आहे अशा नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना वन विभागाने आर्थिक मदत करून हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post