ज्याच्यावर काल बलात्कारचा गुन्हा दाखल…त्यानेच आज केली आत्महत्या!

अकोला:- पातूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एका सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना अकोला शहरातील जुने शहर पोलिस् स्टेशन च्या हद्दीत आज सकाळच्या सुमारस समोर आला आहे. चिखलगाव येथील रहिवाशी कपिल गुलाबराब तायडे असे मृतकाचे नाव असून आपली झालेली बदनामी सहन न झाल्याने कपिल ने आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.


काल पातूर पोलीस स्टेशन आतर्गत एका युवतीने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून दुसऱ्या मुलीशी विवाह जुळवल्याने मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्ष “रिलेशनशिप” मध्ये होते. या मधात बरेचदा त्यांचे शरीरिक संबंध देखील प्रस्तापित झाले होते. काही दिवसांनी कपिल हा सैन्यात भरती झाला व ट्रेनिंग साठी सिकंदराबाद येथे निघून गेला.

दरम्यान तक्रारदार मुलगी ही देखील जॉब साठी पुण्यात राहत असतांना आरोपी एक महिन्याच्या सुट्टीत पीडितेच्या पुणा येथील रूमवर दोन दिवस राहिला व परत तिच्याशी संबंध स्थापित करून आपल्या गावी चिखलगाव येथे आला, त्यानंतर त्याने पीडितेचा फोन ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला असता सदर मुलीने नातेवाईकांना विचारणा केली असता त्याचे दुसऱ्या एका मुलीशी साक्षीगंध झाले असल्याचे समजल्याने पीडित मुलीने आपल्या पालकांसह पातूर पोलीस ठाण्यात येऊन आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.

सदर प्रकरणात दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी कपिल गुलाबरावं तायडे यांच्याविरोधात पातूर पोलीस स्टेशन येथे अप. क्र. 406/22 कलम 376, 376 (2) (n), 376 (3), 506, कलम 3, 4, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा केली करण्यात आला होता. आज सकाळी जुने शहर पोलीस पोलिसांना हिंगणा रोड स्थित विराज पार्क येथे सकाळी पाच वाजता एक युवक गळफास घेतलेल्या परिस्थितीत लटकला असल्याची माहिती प्राप्त झाली. जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यांनी तत्काल घटना स्थळ गाठले अधिक तपास केला असता सदर मृतकाचे नाव हे कपिल गुलाबराव तायडे राहणार चिखलगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सरोपचार रुग्णालय येथे पाठविला असून नेमके प्रकरण काय याचा जुने शहर पोलीस कसून तपास करीत आहेत.

सात वर्ष सोबत राहून आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणी आपली झालेली बदनामी सहन न झाल्याने सैनिक असलेल्या चिखलगाव येथील कपिल गुलाबराव तायडे याने आपले जीवन संपविले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.



Post a Comment

Previous Post Next Post