धावला रे धावला मोटरसायकलच्या मागे धावला बिबट अन्

नासिक ::- जिल्ह्यात बिबट्याचा वावर कायम असून आज बिबट्याने मानवजातीवर हल्ला चढवला आहे. वडिलांसोबत गाडीवरून घरी परतत असताना एक शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला चढवला आहे. शेतातून घरी परतत असताना सदर प्रकार घडला असून मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, गौरी व तिचे वडील मोटारसायकल वरून घरी जात असताना पाटा लगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला . सदर प्रकार हा सोनगिरी येथे घडला आहे. हल्ला चढवलेल्या मुलीचे नाव गौरी राजेंद्र लहाने वय वर्ष 9 असे आहे. व राजेंद्र लहाने व गौरी गाडीवरून जात असताना हा प्रकार घडला आहे. दबा धरून बसलेल्या बिबट्याने इतका जबरी हल्ला चढवला की, गौरी हिच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बिबट्याच्या जबड्यातच तिचा उजवा पाय सापडला होता. त्यावेळी वडील राजेंद्र लहाने व गौरी हिने जोरजोरात आरडाओरडा केला असता तेथून बिबट्याने पळ काढला. नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणे टाळावे, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी आपली जनावरे बंदीस्त बांधावी. रात्रीच्या वेळी रहदारी करणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्य त्वरित जेरबंद करावे असे स्थानिक नागरिकांची मागाणी आहे

Post a Comment

Previous Post Next Post