वैरागड येथील डोकू मानकर यांचे वृध्दापकाळाने निधन.


वैरागड : – येथील बस स्थानक जवळील कुंभार मोहल्यात वास्तव्यात असलेले डोकू गोविंदा मानकर (वय ८३ वर्षे) यांचे दि. ११ नोव्हें. रोजी रात्रौ १०:३० वाजता उपाचार दरम्यान आरमोरी उपजिल्हा रुग्णालय येथे वृध्दापकाळाने निधन झाले. आज दि. १२ नोव्हें. रोजी संध्याकाळी आरमोरी रोड पाच पांडव देवस्थान जवळील त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आले.

 

नव आदर्श मच्छीपालन सहकारी संस्था माजी सदस्य मुन्ना मानकर आणि गडचिरोली येथे पोलिस विभागात कार्यरत असलेले रवि मानकर यांचे वडील होते. तसेच वैरागड ग्रामपंचायत सदस्य छानू मानकर यांचे आजोबा होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई-सुना, नातवंडे तसेच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post