गोवारी समाजाला संविधानिक हक्क मिळतील त्या दिवशी खरा न्याय मिळेल. – प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्मारक समिती अध्यक्ष तथा आदिवासी गोवारी समन्वयक समिती प्रमुख शालीकराम नेवारे. – वैरागड येथे दि. ११ नोव्हें. रोजी वैरागड आदिवासी गोवारी समाज संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम


वैरागड : – गोवारी जमात ही आदिवासी जमात आहे. त्याचे शासकीय पुरावे आहेत. केंद्र आणि राज्य शासनाचे विविध अहवाल आणि अध्यादेशानुसार गोवारी आदिवासी जमात असून तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. यासाठी ११४ शहिदांचे रक्त सांडले. तब्बल २५ वर्षांच्या संघर्षानंतर गोवारी समाजास न्याय मिळाला परंतु खऱ्या न्यायापासून आजही गोवारी बांधव वंचित आहे. गोवारी जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने १४ ऑगस्ट २०१८ रोजी दिला परंतु सर्वच क्षेत्रात आम्हाला आमचे संविधानिक हक्क मिळतील त्या दिवशी खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्मारक समिती अध्यक्ष तथा आदिवासी गोवारी समन्वयक समिती प्रमुख शालीकराम नेवारे यांनी केले.

 

२३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर विधानभवनावर आपल्या मागण्यासाठी गोवारी समाज बांधवांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यात चेंगराचेंगरी होऊन ११४ गोवारी बांधव शहीद झाले. या दिवसाची आठवण म्हणून वैरागड येथे दि. ११ नोव्हें. रोजी वैरागड आदिवासी गोवारी समाज संघटना यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला त्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून शालीकराम नेवारे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्धघाटन गडचिरोली जिल्हा आदिवासी गोवारी जिल्हा समिती समन्वय डेडुजी राऊत यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नागपूर स्मारक समिती उपाध्यक्ष चिंतामण वाघाडे,नागपूर स्मारक समिती सचिव शेखर लंसुते, विहिरगाव ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर शेंदरे, नागपूर येथील दिनेश चौधरी, ठाणेगाव ग्रामपंचायत सरपंच वासुदेव मंडलवार, वैरागड ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, ग्रामपंचायत सदस्य सत्यादास आत्राम, आदेश आकरे, प्रतिभा बनकर, संगीता मेश्राम, दिपाली ढेंगरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष जगदीश पेंद्राम, मुखरू खोब्रागडे, महादेव दुमाणे, वैरागड वन परिक्षेत्र अधिकारी सोनुले, सामाजिक कार्यकर्ते विजय गुरणुले सर, दत्तू सोमनकर, डोणू कांबळे, दिवाकर खरवडे, दिनकर लोथे, विश्वनाथ ढेंगरे आणि निंबा टेकाम मंचावर उपस्थित होते.


 

श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते देवतांची स्थापना करण्यात आली, द्वीप प्रज्वलन, ध्वजारोहण तसेच सामूहिक शहीद गोवारी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आले.

 

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आदिवासी गोवारी जमात शहीद स्मारक श्रद्धांजली समिती अध्यक्ष रवी नेवारे, उपाध्यक्ष प्रकाश नागोसे, सचिव नेताजी नेवारे, सहसचिव विलास नेवारे, कोषाध्यक्ष धर्मा शेंदरे, आदिवासी गोवारी जमात संघटना अध्यक्ष धर्मा राऊत, उपाध्यक्ष पुणाजी नागोसे, सचिव सुखदेव शेंदरे, श्रद्धांजली व्यवस्थापक समिती मंडळाचे भुमेश नेवारे, पंकज नागोसे, कैलास शेंदरे, अंकुश नेवारे, अमोल शेंदरे, पंकज नेवारे, अविनाश राऊत, सचिन शेंदरे, उमेश नागोसे, वाल्मीक नेवारे, करण नेवारे, संदीप नेवारे, प्रशांत नेवारे, प्रेमकुमार नेवारे, वैभव राऊत, शरद राऊत, निलेश नेवारे, साईनाथ नेवारे, हरिदास राऊत, राजेश सहारे, विलास शेंदरे, आदिवासी गोवारी महिला जमात संघटना अध्यक्ष मिना नेवारे, उपाध्यक्षा दुर्गा शेंदरे, सचिव मनीषा राऊत, सहसचिव देवकाबाई नेवारे, कोषाध्यक्ष सपना नेवारे यांनी अथक परिश्रम घेतले. 

 

कार्यक्रमाचे संचालन प्रशांत नागोसे, प्रास्ताविक नेताजी नेवारे तर उपस्थितांचे आभार प्रकाश नागोसे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने गावातील तसेच परिसरातील आदिवासी गोवारी बांधव तसेच नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post