चोप कोरेगाव येथील युवतीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा



ब्रह्मपुरी, ता. ७: न्यायालयाच्या निर्माणाधीन इमारतीच्या प्रवेशद्वाराला ओढणीने गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ६) उघडकीस आली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन गोवर्धन शेंडे (वय ३२ रा. कोंढाळा, ता. देसाईगंड जि. गडचिरोली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सचिन शेंडे हा फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहे.

न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वाराला गळफास घेऊन पौर्णिमा मिलिंद लाडे (वय २७) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येप्रकरणी वडील मिलिंद लाडे यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पौर्णिमाचे साक्षगंध सचिन शेंडे यांच्यासोबत झाले होते. मात्र, त्यानंतर सचिन शेंडे याने लग्नासाठी नकार दिला. लग्नासाठी नकार देत असल्याने तिने नैराश्यातून शेवटी शहरातील दिवाणी व फौजदारी आपली जीवनयात्रा संपवल्याचे न्यायालयाच्या मागील भागात तक्रारीत म्हटले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post