अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या पाशात ओढून लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेणाऱ्या तीन युवकांना झाली अटक

आर्णीः एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या पाशात ओढून लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेणाऱ्या तीन युवकांना आर्णी पोलिसांनी येथील बस स्थानक परिसरातून ताब्यात घेवुन अटक केली. सुफियान अली ताज बैलीम (१८), फैज ताज अली बैलीम (२०), आकाश अजय राठोड (२३) सर्व रा. शास्त्रीनगर आर्णी असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुफियान ताज अली बैलीम या युवकाने इतर दोन युवकाच्या मदतीने अंबोडा येथील एका अल्पवयीन
१७ वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध ठेवून तिला लग्नाचे आमिष दाखवीत फुस लावून पळवून नेण्याच्या बेतात असताना ९ डिसेंबर ते १० डिसेंबर च्या मध्यरात्री दरम्यान आरोपी सूफीयान याला आर्णी पोलिसांनी ताब्यात घेवून चौकशी केली असता इतर दोन तरुण मदत केल्याचे समोर आले. या प्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादी वरून आर्णी पोलिसांनी आरोपी सुफीयान अली ताज अली बैलिम, फैज ताज बैलिम, आकाश अजय राठोड यांच्या विरुध्द कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादवी सह कलम ११, १२ पोस्को नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post