विषारी ‘आरएसएस’

ज्या बहुजन महापुरूषांनी आपले सारे जीवन मानवी समाजाच्या मुक्तीसाठी अर्पण केले, त्या बहुजन महापुरूषांचा सातत्याने अपमान करण्याचा सीलसीला राज्यात कायम आहे. त्याची सुरूवात राज्यपाल (भाज्यपाल) भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून सुरूवात झाली. त्यानंतर बहुजन महापुरूषांच्या बदनामीची मोहिमच राबवण्यात आली.



कोश्यारी यांच्यानंतर मंगलप्रभात लोढा, लोढा यांच्यानंतर प्रसाद लाड आणि आता चंद्रकांत पाटील म्हणजेच चंपा...! या लोकांनी जे काही अकलेचे तारे तोडले त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास ज्या लोकांनी बहुजन महापुरूषांचा अपमान केला ती लोकं सारीच ‘आरएसएस’ची पिलावळ आहेत. ज्या आरएसएसने देशात सातत्याने धर्मा-धर्मात, जाती-जातीत विषारी फुत्कार सोडले, त्यांची ही पिलावळ आहे.



आरएसएसची विचारधारा विषारी का आहे? तर ही संघटना अल्पसंख्य विदेशी ब्राम्हणांची आहे. त्यामुळे बहुजन महापुरूषांच्या द्वेषाची कावीळ त्यांना आधीपासूनच झालेली आहे. त्यामुळे सातत्याने ते बहुजन महापुरूषांचा अपमान करताना दिसतात. ज्यांचा मेंदू ब्राम्हणांकडे गहाण आहे, अशाच लोकांचा वापर बहुजन महापुरूषांचा अपमान करण्यासाठी केला जातो. म्हणजे आरएसएस किती मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये विष पेरत आहे हे लक्षात येते. 



आपली संघटना देशभक्त व राष्ट्रवादी असल्याचा आव आरएसएसकडून आणला जातो. परंतु तसे काही नाही. देशातील आजच्या घडीला सर्वात मोठी दहशतवादी संघटना म्हणून आरएसएस आहे. हे राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यात झालेल्या बॉम्बस्फोटात आरएसएसच्या लोकांचा सहभाग होता हे दिसून आलेले आहे. 



जयपूरमधील विशेष एनआयए कोर्टाने ८ मार्च २०१७ रोजी निकाल दिला. यामध्ये आरएसएसशी संबंधित तीन आतंकवाद्यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यामध्ये सुनील जोशी, देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल यांची नावे होती. त्यांना आजीवन कारावास झालेला आहे. म्हणजेच पहिल्यांदाच आरएसएसच्या कार्यकर्त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.



आरएसएच्या पिलावळीनी नेहमीच बहुजन महापुरूषांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले. त्या पिलावळीमध्ये आजच्या घडीला बोगस शिवशाहीर ब.मो.पुरंदरे, जयंत साळगावकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्था, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे, गिरीश कुबेर, भगतसिंग कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांची नावे समोर येतात. त्यांच्याकडून अशी काय बदनामी केली जाते, की मूळ मुद्यांवरून मग लक्ष्य डायव्हर्ट केले जाते. 



बहुजन महापुरूषांची बदनामी का केली जाते? तर त्यांचा खराखुरा इतिहास समाजासमोर येता कामा नये. बहुजन महापुरूषांचे विचार समाप्त करता येत नसतील तर त्यांच्या चारित्र्याची हत्या करा, एकदा का चारित्र्याची हत्या केली तर लोक त्यांच्या विचारांपासून दूर पळतात. हाच हाथखंडा आरएसएसकडून वापरला जातो. एखादा चुकीचा विचार सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवला की लोकांना वाटते हेच खरे आहे. 



त्यामुळे लोकं कुठलाही विचार किंवा शहानिशा न करता चुकीच्या विचारांवर पटकन विश्‍वास ठेवतात, तेथेच मोठी चूक होते. हे ब्राम्हणांनी चांगलेच ओळखले असल्याने ते सातत्याने बहुजन महापुरूषांचा चुकीचा इतिहास सांगताना दिसतात. बहुजन महापुरूषांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आणि आपले इप्सित साध्य करताना दिसतात.



महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. कारण अन्य राज्यांचा केवळ भूगोल आहे, परंतु महाराष्ट्राला भुगोलाबरोबरच इतिहासदेखील आहे. कारण याच मातीनेच सामाजिक लढा उभारला. त्या सामाजिक लढ्यात अग्रणी असलेल्या बहुजन महापुरूषांचा कुणी ब्राम्हण व त्यांचे चेलेचपाटे अपमान करत असतील तर ते कुणीच सहन करणार नाही. कारण महाराष्ट्राने कधीच शत्रूसमोर नांगी टाकलेली नाही. म्हणून महाराष्ट्र कधीच दिल्लीच्या तख्तापुढे झुकलेला नाही. 



आज बहुजन महापुरूषांच्या बदनामीचा घाट घातला गेला असताना ब्राम्हणवादी लोकांविरोधात समाजातून विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हे माणूस म्हणून जीवंत असल्याचे लक्षण आहे. कारण जर का विरोध केला नाही तर जीवंत असूनही माणूस मेल्यासारखाच आहे. विरोध न करणारे मेलेले मुडदे काय कामाचे? आज लोकं खुलेआमपणे आरएसएसला विरोध करताना दिसत आहेत. 



सरळसरळ मोहन भागवत यांची चंपी केली जात आहे. कारण लोकांमध्ये विष पेरण्याचे काम आरएसएसकडून केले जात आहे. एकंदरीत भारताच्या मुळावर आरएसएसची विकृती आली आहे. प्रत्येकाचा द्वेष करणे आणि आपापसात भांडणे लावणे हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम राहिला आहे. आपापसात भांडणे लावल्याशिवाय त्यांची राजकीय पोळी भाजता येत नाही. मग धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम केले जाते. 



त्यात आपल्या लोकांना धर्म नावाच्या अफूच्या गोळीची नशा चढते आणि आपलाच माणूस ब्राम्हणांच्या कळपात शिरून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ब्राम्हणवाद आणखी मजबूत होऊन ते खुलेआमपणे बहुजन महापुरूषांच्या बदनामीची मोहिम चालवतात. 



ब्राम्हण हा हुशार नसून आपल्या अज्ञानामुळे ब्राम्हणवादाचा डोलारा उभा आहे. बहुजन जागृत होऊन जाब विचारायला लागली तर क्षणार्धात ब्राम्हणवाद पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल यात शंकाच नाही.

Post a Comment

Previous Post Next Post