भगव्या वेशातील साधू बलात्कार…” ‘बेशरम रंग’ गाण्यावरून होणाऱ्या वादावर प्रकाश राज संतापले

अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या अभिनयासह स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते राजकीय विषयांवर त्यांची मतं ठामपणे मांडत असतात. ते विशेषतः केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दिसतात. सध्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून होणाऱ्या वादावर त्यांनी भाष्य केलं आहे. ट्वीट करत त्यांनी आपले मत मांडले आहे.

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यावर टीका होऊ लागली. या गाण्यात शाहरुख दीपिकाचा बोल्ड अंदाज दिसत आहेच त्याचबरोबरीने तिने भगव्या रंगाची मोनोकीनी परिधान केली आहे. त्यावरून अनेकांनी टीका केली आहे. यावरच प्रकाश राज यांनी ट्वीट केलं. ते असं म्हणाले, “बॉयकॉट करणाऱ्यांनो, तेव्हा ठीक आहे आहे का जेव्हा भगवे वस्त्र धारण केलेले पुरुष बलात्काऱ्यांना हार घालतात, द्वेषपूर्ण भाषण देतात. दलाल लोकांना आमदार करतात. भगवा परिधान केलेले स्वामीजी अल्पवयीन मुलींवर बलात्कार करतात मात्र तुम्हाला असे कपडे चित्रपटात चालत नाहीत?” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे

प्रकाश राज ट्वीटरवर सक्रीय असतात. प्रामुख्याने ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात. अभिनेत्री रिचा चड्ढाने भारतीय लष्कराच्याबाबतीत वादग्रस्त विधान केले होते तिला समर्थन देणारे ट्वीट प्रकाश राज यांनी केले होते.


Post a Comment

Previous Post Next Post