अखेर वनविभागाच्या अडचणीमुळे रखडलेले प्रश्न निघाले निकाली*



आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, एटापल्ली-आलापल्ली, आलापल्ली- मुलचेरा-आष्टीसह मुलचेरा-घोट -रेगडी रस्त्यांच्या बांधकामाला वन विभागाने दिली मंजुरी

खासदार अशोक नेते व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाला यश

गडचिरोली :- अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक विकास कामे मागील अनेक दिवसांपासून वनविभागाच्या अडथळ्यामुळे प्रलंबित होती. ती कामे मार्गी लागावे, यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रयत्न चालविले होते. नुकतीच नागपूर येथील वनभवनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत त्यांनी सदर समस्या लावून धरल्या. यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोट येथील नवोदय विद्यालयाच्या जमीनीसह आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, एटापल्ली-आलापल्ली, आलापल्ली- मुलचेरा-आष्टीसह मुलचेरा-घोट -रेगडीसह अन्य प्रमुख मार्गातील अडसर दूर करण्यास वन विभागाने मंंजुरी दिली. यामुळे खासदार अशोक नेते व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.




नागपूर येथील वनभवनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घोट विद्यालयाच्या जमीनीचा प्रश्न मार्गी लागला. यामुळे भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली- मुलचेरा-आष्टी, रेगडीसह प्रमुख  रस्त्यांच्या बांधकामाला वनभवन नागपूर येथे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी वन विभागाच्या अडचणीमुळे रखडलेले प्रश्न मार्गी  लावले.

वनभवन नागपूर येथे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्यासह वनविभागाचे प्रधान सचिव, विभागातील मुख्य वनसंरक्षक तथा उपवनसंरक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

नवोदय विद्यालय घोटच्या जमिनीचे नाहरकत प्रमाणपत्र वनविभागाने दिले नसल्याने भूसंपादनाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. आता त्यालाही मंजुरी मिळाल्याने जमिनीचा मार्ग निकाली लागला आहे. तसेच जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, एटापल्ली-आलापल्ली यासह प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची कामे वनविभागातील असलेल्या काही अडचणींमुळे थांबलेली असल्याने त्या सर्व अडचणी या बैठकीमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत निकाली काढण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post