अवैध करंट लावुन शिकार करण्याचा प्रयत्न करणा-या दोन आरोपींना अटक*

चामोर्शी वनपरिक्षेत्राची कारवाई


चामोर्शी:- चामोर्शी वनपरिक्षेत्रा अंतर्गत सोनापुर, नियतक्षेत्रात दिनांक 19/12/2022 रोजी रात्रो जंगल परिसरात अवैध्य करंट लावला असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता सोनापूर नियत क्षेत्रातील कंपार्टमेंट नं.1553 मध्ये सामूहिक गस्त करीत पाळत ठेवली असताना रात्रीच्या वेळेस जंगल परिसरात दोन संशयित इसम आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी जंगल परिसरात विद्युत करंट लावुन शिकार करण्यासाठी आलेलो आहोत असल्याचे सांगितले. शंकर सुखरंजन घरामी व प्रशांत संतोष सिकदर दोघेही रा.श्रीनिवासपुर अशी आरोपींची नावे आहेत.
      दोन्ही आरोपीं विरुध्द वनगुन्हा क्रमांक. 08173/204306/06/2022 दि. दि.20/12/2020 अन्वये वनगुन्हा नोंद करून दोघांना अटक करून दि.21.12.2022 रोजी मा. न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांचे दालनात हजर करण्यात आले असता आरोपींना जामिन मंजुर झाला.
या घटनेचा पुढील तपास मा.राहुलसिंह टोलीया ,उपवनसंरक्षक वनविभाग आलापल्ली, श्री.प्रदिप बुधनवर प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, आलापल्ली यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आर.बी.इंनवाते वनपरिक्षेत्र अधिकारी,चामोर्शी यांच्या नेतृत्वात श्री.ए.व्ही.लिंगमवार क्षेत्र सहाय्यक, चामोर्शी,व्हि.एस.चांदेकर क्षेत्र सहाय्यक,भाडभिडी, मुंजूमकर वनपाल, कु.जे.ए.निमसरकार , वनरक्षक सोनापुर, आनंद साखरे वनरक्षक चामोर्शी, कैलास नैताम, विठ्ठल मेश्राम, किशोर वैरागडे, विकास लांजेवार, वनरक्षक,कोसरे वनरक्षक, ईश्वर जनबंधू वनमजुर,जगदिश उडान ऑपरेटर आदी कर्मचारी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post