दारू प्यायला येत नाही म्हणून काढली तलवार !

 
भद्रावती शेजारी राहणारा चुलत भाऊ दारू पिण्यासाठी येत नाही म्हणून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात त्याने तलवार काढली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही घटना बुधवारी रात्री दरम्यान घडली.


प्रशांत बदखल (रा. गवराळा) असे आरोपीचे नाव आहे. नागोबा बदखल असे फिर्यादीचे नाव आहे. नागोबा बदखल याच्याकडे घरगुती कार्यक्रम होता. याकरिता शेजारील नातेवाईक आले होते. त्यात प्रशांत हा सुद्धा आला होता. या कार्यक्रमात त्याने चुलत भाऊ नागोबा याला दारू पिण्यासाठी हट्ट केला. तो दारू पिण्यासाठी येत नाही म्हणून दोघात वाद झाला. यावरून प्रशांतने घरी जाऊन तलवार काढली. यामुळे सर्वच भयभीत झाले व भद्रावती पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तलवारीसह आरोपीला अटक केली असून, पुढील भद्रावती तपास पोलीस करीत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post