आली रे आली तलाठी भरती आली

महाराष्ट्र राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली ३११० पदे अशा एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने महसूली विभागनिहाय तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाचा पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

खालील विवरणपत्र अ तक्त्यातील तलाठी (गट-क) संवर्गाच्या भरावयाच्या पदांबाबत मागासवर्गीय कक्षाकडून बिंदुनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणनिहाय तपशील (VACANCY MATRIX ) खालील विवरणपत्र व प्रमाणे जिल्हानिहाय माहिती कोणत्याही परिस्थितीत १५ दिवसात शासनास पाठविण्यात येणार.

त्याकरीता तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने आपल्या विभागाच्या अधिनस्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविण्यात येणारी माहिती प्राप्त करुन ती शासनास सादर करण्याबाबत सर्व उपआयुक्त (महसूल) यांना “समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. तरी सदरची माहिती कोणत्याही परिस्थितीत विहीत कालावधीत तपासून खारा दुताव्दारे शासनास पाठविण्यात येणार.

एकूण जागा : ४१२२ जागा.

पदाचे नाव: तलाठी

अ.क्र. जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1 अहमदनगर ३१२. 18 नागपूर १२५
2 अकोला १९ 19 नांदेड ११९
3 अमरावती ४६ 20 नंदुरबार ४०
4 औरंगाबाद १५७ 21 नाशिक २५२
5 बीड १६४. 22 उस्मानाबाद ११०
6 भंडारा ४७.    23 परभणी ८४
7 बुलढाणा ३१          24 पुणे ३३९
8 चंद्रपूर १५१.          25 रायगड १७२
9 धुळे २३३              26 रत्नागिरी १४२
10 गडचिरोली १३४.       27 सांगली ९०
11 गोंदिया ६०.            28 सातारा ७७
12 हिंगोली ६८           29 सिंधुदुर्ग ११९
13 जालना ९५           30 सोलापूर १७४
14 जळगाव १९८.        31 ठाणे ८३
15 कोल्हापूर ६६         32 वर्धा ६३
16 लातूर ५०             33 वाशिम १०
17 मुंबई शहर/उपनगर ५८      34 यवतमाळ ७७
35 पालघर १५७


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post