डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. तर त्यांनी लोकांकडं भीक मागितली - भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळवीर आहेत. हे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले आहे.


औरंगाबाद : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. पैठण येथील कार्यक्रमात ते बोलत होते. त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली. असं म्हणताना पाटील यांनी दुपट्टा समोर केला. ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.


या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये वाचाळवीर आहेत. हे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी दाखवून दिले आहे. महापुरुषांनी लोकवर्गणीतून शाळा उभारल्या.




स्वतः जवळचापण पैसा खर्च केला. त्यांनी काही भीक मागितली नाही. भीक म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या महापुरुषांचा अपमान केला. नवीन शाळा काढतात. त्यांना तुम्ही शाळा सुरू करण्यासाठी भीक मागा, असा सल्ला दिला.

महाराष्ट्रातील जनतेनं चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं बघावं. तुमच्यासारखे भिकारचोर आमचे महापुरुष नव्हते, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. पाटील यांनी मंत्रीपदासाठी काय भीक मागितली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

चंद्रकातं पाटील यांचं वक्तव्य महापुरुषांचं अपमान करणारं आहे. अशा वक्तव्यावर निषेध करून चालणार नाही. अशा व्यक्तींना योग्य धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, असंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post